येवल्यात नो मास्क, नो एन्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 00:44 IST2020-11-11T22:25:21+5:302020-11-12T00:44:59+5:30
येवला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाच्या आदेशानुसार ह्यनो मास्क, नो एन्ट्रीह्ण हा नियम शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणी अनिवार्य करण्यात आला असल्याची माहिती नगर परिषदेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी दिली.

येवल्यात नो मास्क, नो एन्ट्री
ठळक मुद्देघराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे.
येवला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाच्या आदेशानुसार ह्यनो मास्क, नो एन्ट्रीह्ण हा नियम शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणी अनिवार्य करण्यात आला असल्याची माहिती नगर परिषदेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी दिली.
नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. तसेच दुकानदारांनीदेखील मास्क न लावलेल्या ग्राहकांना दुकानात प्रवेश देऊ नये, विना मास्क फिरणारे नागरिक, ग्राहक आढळून आल्यास तसेच सोशल डिस्टन्सिंग न पाळणार्यांवर पाचशे रूपये दंड आकारण्यात येणार असल्याचेही नांदूरकर यांनी सांगितले.