पुणेकरांना मागे टाकत नाशिककर रांगेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 01:43 AM2019-04-30T01:43:48+5:302019-04-30T01:44:09+5:30

उद्योग, व्यवसायासोबतच शिक्षणासारख्या विविध क्षेत्रांतही नाशिकपेक्षा एक पाऊल पुढे असलेल्या पुण्याला यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवून पुण्याला मागे टाकण्याची संधी साधण्यासाठी नाशिककर सोमवारी (दि.२९) सकाळपासून रांगेत उभे असल्याचे दिसून आले.

 Nashikkar quits following Puneites | पुणेकरांना मागे टाकत नाशिककर रांगेत

पुणेकरांना मागे टाकत नाशिककर रांगेत

Next

नाशिक : उद्योग, व्यवसायासोबतच शिक्षणासारख्या विविध क्षेत्रांतही नाशिकपेक्षा एक पाऊल पुढे असलेल्या पुण्याला यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवून पुण्याला मागे टाकण्याची संधी साधण्यासाठी नाशिककर सोमवारी (दि.२९) सकाळपासून रांगेत उभे असल्याचे दिसून आले. विविध संघटनांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘मतदानात पुण्याला मागे टाकण्याची हीच संधी’ असल्याच्या पोस्टमधून नाशिककरांना मतदानासाठी केलेल्या आवाहनाला मतदारांनी उत्स्फू र्त प्रतिसाद देत तासनतास रांगेत उभे राहून मतदान केले.
पुण्यात यंदा पन्नास टक्क्यांच्या आत मतदान झाले असल्याने पुण्यातील सुशिक्षित मतदारांवर टीका होत असताना ‘पुण्यापेक्षा नको उणे’ असा विचार करून लोकशाहीचा महाउत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढून लोकशाही सक्षम व्हावी, यासाठी विविध संघटनांकडून जनजागृतीवर भर दिला होता. त्याला नाशिककरांनीही शहरातील विविध मतदान केंद्रावर प्रतिसाद देत सकाळपासून रांगा लावून मतदान केले.
लोकसभा निवडणूक देशाचे भवितव्य ठरविणारी निवडणूक असतेच, परंतु पाच वर्षांसाठी काम करणारा लोकप्रतिनिधी कोण हवा याबाबतही मतदार आपला कौल देत असतात. मतदानाला गेलेच नाही तर नंतर सरकार किंवा निवडून येणाऱ्या खासदाराने कमी अधिक प्रमाणात कामे केली किंवा नाही तर त्याला जाब विचारण्यात काय अर्थ? असा प्रश्न करूनच विविध संघटना या प्रचार मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. यात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ‘व्होट कर नाशिककर’ ही मोहीम सुरू झाली असून, अनेक संघटनांनी फेसबुक, व्हॉट््स अ‍ॅप, टष्ट्वीटर आणि जाहीरपत्रकांद्वारे मतदानाचे कर्तव्य पार पाडा आवाहन केले.  तसेच मतदानानंतर संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आपले सेल्फीही सोशल मीडियावरही मतदारांना मतदानासाठी घराबाहेर पडण्याचे आवाहन केले. यात प्रामुख्याने नाशिक सिटीझन फोरम, महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्स, क्रेडाई, नरेडको, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, इन्स्टिट्यूट आॅफ इंडियन इंटेनिअर डिझायनर, आर्किटेक्ट अ‍ॅँड इंजिनिअर असोसिएशन अशा अनेक संघटनांनी मतदारांना मतदानाचे आवाहन केले. तसेच महापालिकेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनीही मतदार जागृती फेºया काढून मतदानासाठी आवाहन केले होते.
या मोहिमेत काही खासगी शाळांनीही सहभाग घेतला होता. यात अक्षर संस्कार फाउंडेशन, वाघ गुरुजी शाळा, मराठा हायस्कूल, मविप्र, नाएसो व नाशिप्र सारख्या शिक्षणसंस्थांच्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनीही मतदार जागृती अभियानात सहभाग घेऊन नाशिककरांना मतदान करण्याचे आवाहन केले होते.  या सर्व संघटनांच्या आवाहनाला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध मतदान केंद्रावर रांगा लावून मतदान केले. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढला.

व्हीव्हीपॅटची उत्सुकता
लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत यावर्षी पहिल्यांदाच व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर करण्यात आला. या यंत्राविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध संघटनांनी जनजागृती केली होती. शिवाय विविध राजकीय पक्षांच्या राष्ट्रीय नेत्यांनीही मतदान केल्यानंतर व्हीव्हीपॅट यंत्रावर येणाºया प्रिंटवर खात्री करून घेण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे मतदारांनी मतदान केल्यानंतर सात सेकंद थांबून यंत्रातून व्हीव्हीपॅटमध्ये आपण मतदान केलेल्या उमेदवाराच्या निवडणूक चिन्हाचीच प्रिंट येते की नाही याची खात्री करून घेतली.

Web Title:  Nashikkar quits following Puneites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.