नायगाव शिवराज्यभिषेक दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 01:10 IST2021-06-08T23:12:33+5:302021-06-09T01:10:59+5:30

नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव खोऱ्यातील सर्वच ग्रामपंचायत कार्यालयांत शिवराज्यभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Naigaon Shivrajyabhishek Day in excitement | नायगाव शिवराज्यभिषेक दिन उत्साहात

नायगाव शिवराज्यभिषेक दिन उत्साहात

ठळक मुद्दे ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात स्वराज्य गुढी उभारण्यात आली.

नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव खोऱ्यातील सर्वच ग्रामपंचायत कार्यालयांत शिवराज्यभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

नायगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात स्वराज्य गुढी उभारण्यात आली. सरपंच मनीषा कदम यांच्या हस्ते स्वराज्य गुढीचे पूजन करण्यात आले. यावेळी उपसरपंच भाऊसाहेब सांगळे, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय बन, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
जायगाव ग्रामपंचायतीच्या वतीने स्वराज्य गुढी उभारण्यात आली होती. सरपंच शालिनी दौंड यांच्या हस्ते भगवा ध्वज व गुढीचे पूजन तर उपसरपंच दत्ता दिघोळे यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध गीते सादर केली. यावेळी ग्रामसेवक आर. टी. सांगळे आदी उपस्थित होते.
देशवंडी येथे सरपंच दत्ताराम डोमाडे यांच्या हस्ते भगव्या ध्वजासह स्वराज्य गुढीचे पूजन करण्यात आले. यावेळी पोलीस पाटील मुकेश कापडी यांनी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. या कार्यक्रमास पंचायत समितीच्या माजी सदस्य सोनल कर्डक, नवनाथ कापडी, सुभाष बर्के, भाऊराव कापडी, प्रवीण कर्डक आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
ब्राह्मणवाडे ग्रामपंचायतीच्या वतीने भगवानबाबा मंदिराच्या प्रांगणात सरपंच कैलास गिते यांनी ध्वज व स्वराज्य गुढीचे पूजन केले.
यावेळी ग्रामविकास अधिकारी गजानन वटाणे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
 

Web Title: Naigaon Shivrajyabhishek Day in excitement