इगतपुरीतील साहित्य संमेलन पुढे ढकलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 00:04 IST2021-02-23T00:04:39+5:302021-02-23T00:04:39+5:30
वाडीवऱ्हे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार इगतपुरीतील २२ वे ग्रामीण साहित्य संमेलन काही काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष पुंजाजी मालुंजकर यांनी दिली.

इगतपुरीतील साहित्य संमेलन पुढे ढकलले
वाडीवऱ्हे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार इगतपुरीतील २२ वे ग्रामीण साहित्य संमेलन काही काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष पुंजाजी मालुंजकर यांनी दिली.
कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात हे संमेलन दि. २६ आणि २७ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार होते. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर नियोजित पाहुण्यांच्या उपस्थितीत हे संमेलन पार पडेल असे इगतपुरी तालुका साहित्य मंडळाच्या बैठकीत जाहीर करण्यात आले. बैठकीस बाळासाहेब पलटणे, प्राचार्य भाबड, प्रा. देविदास गिरी, ॲड. ज्ञानेश्वर गुळवे, दत्तात्रय झनकर, हिरामण शिंदे उपस्थित होते.