कादवाची उद्या ऑनलाईन सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 00:42 IST2021-03-02T21:39:15+5:302021-03-03T00:42:34+5:30

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि.४) ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या सभेच्या नोंदणीसाठी मुदत वाढविण्यात आली असून जास्तीत जास्त सभासदांनी नोंदणी करत ऑनलाईन सहभागी होण्याचे आवाहन चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले आहे.

Kadavachi online meeting tomorrow | कादवाची उद्या ऑनलाईन सभा

कादवाची उद्या ऑनलाईन सभा

ठळक मुद्देकोरोनाच्या प्रार्दुभावामुळे साखर कारखान्याची वार्षिक सभा ऑनलाईन

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि.४) ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या सभेच्या नोंदणीसाठी मुदत वाढविण्यात आली असून जास्तीत जास्त सभासदांनी नोंदणी करत ऑनलाईन सहभागी होण्याचे आवाहन चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले आहे.

कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे जिल्हा प्रशासनाने कादवा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्याचे सूचित केले, त्यानुसार ऑनलाईन सभा गुरुवारी दुपारी एक वाजेपासून सुरु होणार आहे. सभासदांनी ६६६.‘ं६िं२४ँ१.ूङ्मे या संकेतस्थळावर जाऊन बुधवारी (दि.३) सायंकाळी पाच पर्यंत नोंदणी करावी असे कादवा व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Kadavachi online meeting tomorrow