Inspectors appointed at Yeola | येवला येथे नेमले निरीक्षक
येवला येथे नेमले निरीक्षक

ठळक मुद्देसर्व पोष्टल मतदान स्वीकारण्यात येणार आहे.

येवला : येवला विधानसभा मतदारसंघासाठी २४ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे.
फेरीनिहाय निकाल बाहेर थांबलेल्या कार्यकर्त्यांना कळणार आहे. लाऊड स्पिकरही जवळच लावण्यात येतील. अशी माहिती मिळाली आहे. येवला लासलगाव मतदारसंघातील मतमोजणी शहरातील शासकीय आय टी आय मध्ये होणार आहे. मतमोजणीच्या पारदर्शकतेसाठी एक निरीक्षक असतील. मतमोजणीच्या दिवशी सकाळी आठपर्यंत येणारे सर्व पोष्टल मतदान स्वीकारण्यात येणार आहे.
मतमोजणीच्या ठिकाणी मोबाइल वापरावर निर्बंध आहे. मतमोजणी अधिकारी, कर्मचार्यांचे मोबाइल बाहेर ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. माध्यमांना प्रक्रि येचे चित्रीकरण केवळ कॅमेरातूनच करता येईल. मोबाइलवर करता येणार नाही.
मतमोजणीच्या दोन्ही ठिकाणच्या अधिकारी, कर्मचार्यांना चहा, नाष्टा, भोजनाची व्यवस्था केली आहे.

Web Title: Inspectors appointed at Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.