दोडी-नांदूरशिंगोटे येथील समाधीस्थळाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 18:54 IST2020-08-05T18:54:05+5:302020-08-05T18:54:39+5:30
सिन्नर : दशनाम गोसावी समाधी बचाव समितीचे सिन्नर तालुकाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय गोसावी यांनी नुकतीच नांदुरशिंगोटे येथे भेट देऊन समाजाच्या समाधी स्थळाची पाहणी केली तसेच माणसापुरी महाराज यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले.

दोडी-नांदूरशिंगोटे येथील समाधीस्थळाची पाहणी
सिन्नर : दशनाम गोसावी समाधी बचाव समितीचे सिन्नर तालुकाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय गोसावी यांनी नुकतीच नांदुरशिंगोटे येथे भेट देऊन समाजाच्या समाधी स्थळाची पाहणी केली तसेच माणसापुरी महाराज यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले.
यावेळी गोसावी यांनी तेथील रतन बाबा गोसावी यांच्याकडून समाधी विषयी माहिती जाणून घेतली व त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. याप्रसंगी सुभाष पुरी, दशनाम गोसावी समाधी बचाव समितीचे अकोले उपाध्यक्ष राजू गोसावी, अवधूत गोसावी, चंद्रकांत पुरी, प्रसाद गोसावी, प्रतीक गोसावी, रोहित गोसावी, किरण गोसावी, सुनील गोसावी, संजय गोसावी, जीवन गोसावी, आदी उपस्थित होते.
दरम्यान दोडी खुर्द येथील समाधी व समाधी परिसराची साफसफाई करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे युवानेते उदय सांगळे यांच्या प्रयत्नातून समाधी संरक्षणासाठी चारही बाजूंनी तार कंपाउंड व प्रवेशद्वार दिल्याची माहिती गोसावी यांना समजली. नांदूरशिंगोटे व दोडी या दोन्ही गावांमध्ये दत्तात्रेय गोसावी यांचा समाजबांधवांनी सत्कार केला. यावेळी रमेश आव्हाड, गोरख गोसावी, शंकर आव्हाड, प्रकाश बोडके, शरद बोडके, गोपाल गोसावी, सार्थक गोसावी, अजित शेख, श्रीहरी गोसावी, नवनाथ गोसावी आदी उपस्थित होते.