येवला तालुक्यात विविध उपक्र मांनी स्वातंत्र्यदिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 16:47 IST2020-08-17T16:47:22+5:302020-08-17T16:47:46+5:30
येवला : तालुक्यात विविध उपक्र मांनी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुखेड येथील जीवन अमृत इंग्लिश मेडियम स्कुलमध्ये ध्वजपूजन संस्थाध्यक्ष के. डी. कदम यांच्या हस्ते तर ध्वजारोहण मुख्यध्यापिक रेखा जोशी यांच्या हस्ते झाले. दीपाली जगताप, भारती कुमार, पुष्पा बडवर आदी उपस्थित होते.

येवला तालुक्यात विविध उपक्र मांनी स्वातंत्र्यदिन साजरा
येवला : तालुक्यात विविध उपक्र मांनी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुखेड येथील जीवन अमृत इंग्लिश मेडियम स्कुलमध्ये ध्वजपूजन संस्थाध्यक्ष के. डी. कदम यांच्या हस्ते तर ध्वजारोहण मुख्यध्यापिक रेखा जोशी यांच्या हस्ते झाले. दीपाली जगताप, भारती कुमार, पुष्पा बडवर आदी उपस्थित होते.
न्यू इंग्लिश स्कूल, भारम
शिक्षण प्रसारक मंडळ नगरसूल संचिलत भारम येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सेवानिवृत्त मेजर दिलीप शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून भारतीय सैनिक सिद्धार्थ पगारे उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक के. यू. अहिरे यांनी तर पर्यवेक्षक एस. बी. गाडे यांनी सूत्रसंचालन केले.
ग्रामपंचायत कार्यालय, पिंपळगाव लेप
पिंपळगाव लेप येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे तंटामुक्ती अध्यक्ष अशोक दौंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी मुलींनी राष्ट्रगीत, देशभक्तीपर गीते सादर केली. कार्यक्र मास माजी सरपंच माणिक रसाळ, मुख्याध्यापिका उज्ज्वला मेतकर, संतोष गायकवाड, दगुजी सोनवणे, शीतल सानप आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.