इगतपुरीच्या शिवणकाम कारागीरांनी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 00:01 IST2020-06-21T21:36:48+5:302020-06-22T00:01:24+5:30
नांदूरवैद्य : कोरोनाच्या पाशर््वभूमीवर दोन ते अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सर्व ठिकाणी दुकाने, व्यवसाय, शाळा, महाविद्यालये आदी बंद करण्यात आले असून अनेक व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याच पाशर््वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील शिवणकाम कारागीरांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे व्यथा मांडत निवेदनाद्वारे विविध समस्यांच्या निवारणाचे साकडे घातले.

छगन भुजबळ यांच्याकडे व्यथा मांडताना शिवा काळे, राजू राखेचा, प्रकाश साळी, अरूण अवसरकर आदी.
नांदूरवैद्य : कोरोनाच्या पाशर््वभूमीवर दोन ते अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सर्व ठिकाणी दुकाने, व्यवसाय, शाळा, महाविद्यालये आदी बंद करण्यात आले असून अनेक व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याच पाशर््वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील शिवणकाम कारागीरांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे व्यथा मांडत निवेदनाद्वारे विविध समस्यांच्या निवारणाचे साकडे घातले.
लॉकडाऊन काळात या कारागीरांना लग्न, तसेच धार्मिक कार्यक्र म, विधी बंद असल्यामुळे ग्राहक फिरकला नसल्यामुळे त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली असून त्यांना शासनाकडून काही मदत मिळवून देण्यात यावी अशी मागणी इगतपुरी तालुका समता परिषदेचे अध्यक्ष शिवा काळे यांच्या नेतृत्वाखाली शिवणकाम कारागीरांनी केली.
तर भुजबळ यांनी आलेल्या शिष्टमंडाळासोबत चर्चा केली व शासन स्थरावर चर्चा करून न्याय मिळवून देण्यात येईल असे आश्वासन दिले. राजू राखेचा, प्रकाश साळी, विजय भोले, नीलेश दालभगत, अरूण अवसरकर, दिनकर दालभगत, दीपक महाले, आयाज पानसरे आदी यावेळी उपस्थित होते.