..If counting process will be implemented ... | ..अशी राबविली जाईल मतमोजणी प्रक्रिया...
..अशी राबविली जाईल मतमोजणी प्रक्रिया...

नाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी अंबड औद्योगिक वसाहतीतील सेंट्रल वेअर हाउस येथे सकाळी आठ वाजता करण्यात येणार आहे. या मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय चौदा अशाप्रकारे एका मतदारसंघासाठी ८४ टेबल लावण्यात येतील. जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांसाठी एकूण १६८ टेबल असतील.
मतमोजणीचे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतमोजणीपूर्व प्रशिक्षण देण्यात आले आहे. मात्र कोणत्या विधानसभा मतदारसंघाच्या कोणत्या टेबलवर त्याची नेमणूक केली जाईल याविषयी पूरेपूर गोपनीयता पाळण्यात आली असून, प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी सकाळी सहा वाजता ‘रॅण्डम’ पद्धतीने त्याची नेमणूक करण्यात येणार आहे. मतमोजणीच्या एका टेबलवर तीन कर्मचारी असतील. त्यात एक सूक्ष्म निरीक्षकाचा समावेश असेल. हा सूक्ष्म निरीक्षक फक्त निवडणूक आयोगाच्या अखत्यारित काम करेल. केंद्र सरकारच्या अखत्यारितील अधिकाºयांची सूक्ष्म निरीक्षक म्हणून नेमणूक केली जाईल.
दोन्ही मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रत्येकी १९२ पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक व सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. आकडेवारी गोळा करण्यासाठी ६४ कर्मचाºयांची तर ३६ रो आॅफिसर व १९२ शिपायांची नेमणूक करण्यात आली आहे.
नाशिक व दिंडोरी मतदारसंघांच्या मतमोजणीसाठी १५० सिलिंग स्टाप असणार आहे. मतमोजणी झाल्यानंतर त्यांच्याकडून पुन्हा मतदान यंत्र सील करून ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर मीडिया कॉर्डिनर म्हणून ८ अधिकाºयांची नेमणूक करण्यात आली आहे.
मतमोजणी कर्मचारी व अधिकाºयांकडून मतमोजणी प्रक्रिया राबविताना अवलंबिलेल्या पद्धतीवर हे सूक्ष्म निरीक्षक लक्ष ठेवतील व तशी नोंद त्यांच्या जवळील कागदपत्रांवर घेऊन त्याबाबतचा अहवाल थेट निवडणूक निरीक्षकांना सादर करतील.
जिल्ह्यात जवळपास साडेबारा हजार सर्व्हिस व्होटर असल्यामुळे या सर्वांना निवडणुकीपूर्वीच पोस्टाने व ईटीपीबीएस प्रणालीने मतपत्रिका पाठविण्यात आल्या होत्या. त्यापैकी जवळपास साडेपाच हजाराच्या आसपास मतपत्रिका पोस्टाने वा त्या त्या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या कार्यालयातील मतपेटीत टाकण्यात आल्या आहेत.
पोस्टल मतपत्रिकांची अगोदर मोजणी करण्याचे आयोगाचे निर्देश आहेत. त्यासाठी दोन्ही मतदारसंघांत प्रत्येकी चार चार टेबल लावण्यात आले आहेत. एक टेबल लावण्यात यावा व प्रत्येक वेळी फक्त पाचशे मतपत्रिकांची मोजणी करावी, अशा सूचना आहेत. पोस्टल मतपत्रिका मोजण्यासाठी चार उपजिल्हाधिकारी व अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, १२ मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक, ८ सूक्ष्म निरीक्षक, ६ आकडेवारी एकत्रितकरण स्टाप व १२ शिपायांची नेमणूक करण्यात आली आहे.
मतमोजणीसाठी १६० कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. सकाळी बरोबर आठ वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात येईल. सर्वात अगोदर पोस्टल मतपत्रिका मोजल्या जातील. पोस्टल मतपत्रिकांची मोजणी सुरू झाल्यानंतर साडेआठ वाजेनंतर प्रत्यक्ष इलेक्ट्रॉनिक यंत्रातील मतांची मोजणी सुरू केली जाईल.
असे झाले मतदान...
नाशिक लोकसभा मतदारसंघ
सिन्नर- पुरुष-१०७५८४, महिला- ८६७३२= ६४.९७ टक्के
नाशिक पूर्व- पुरुष-१०६३६९, महिला- ८७७४९=५५.०६ टक्के
नाशिक मध्य- पुरुष-९५०५५, महिला- ८१७२३=५५.९५ टक्के
नाशिक पश्चिम- पुरुष-१२३००५, महिला- ९४०९९=५५.६१ टक्के
देवळाली- पुरुष- ८८१९५, महिला- ७१९५५ =६०.७३ टक्के
इगतपुरी- पुरुष- ९५४५७, महिला- ८०५९२ =६७.६० टक्के
दिंडोरी लोकसभा मतदारसंघ
नांदगाव- पुरुष- १००९५० महिला- ८०७१९= ५७.४९ टक्के
कळवण- पुरुष- १०४४२२ महिला- ८९९५५= ७२.५३ टक्के
चांदवड- पुरुष- १०२३४७ महिला- ७९३०१= ६५.०७ टक्के
येवला- पुरुष- १०३१७१ महिला- ७७५७५= ६१.१५ टक्के
निफाड- पुरुष- ९४६४७ महिला- ७४८९१= ६३.३१ टक्के
दिंडोरी- पुरुष- १२२५४८ महिला- १०४१९०=७५.०५ टक्के


Web Title:  ..If counting process will be implemented ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.