कुमावत समाजाच्या वतीने गुणवंतांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 15:03 IST2020-08-18T15:02:32+5:302020-08-18T15:03:29+5:30

पाथरे : नाशिक येथे जिल्हा कुमावत बेलदार समाज उन्नती मंडळाच्या वतिने 13 वा गुणगौरव सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला.

Honoring of meritorious people on behalf of Kumawat community | कुमावत समाजाच्या वतीने गुणवंतांचा सत्कार

कुमावत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करतांना कुमावत समाज उन्नती मंडळाचे पदाधिकारी.

ठळक मुद्देसमाजातील यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

पाथरे : नाशिक येथे जिल्हा कुमावत बेलदार समाज उन्नती मंडळाच्या वतिने 13 वा गुणगौरव सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला.
कुमावत समाजातील 10 वी 12 वीत चांगल्या गुणांनी यशस्वी झालेल्या तसेच विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा उन्नती मंडळाच्या वतीने गुणगौरव करण्यात आला. नाशिक येथील कुमावत नगर मध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजातील यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व पालक, विद्यार्थी, उपस्थितांनी सामाजिक दुरी, मास्क, सॅनिटाइयरचा वापर केला. आयोजकांनी गर्दी होणार नाही याची काळजी घेतली. उन्नती मंडळ नेहमी समाज हिताची कामे करत आहे. समाजातील सर्वच व्यक्तींना उपयुक्त ठरतील असेच उपक्रम राबविले जातात. यशस्वी विद्यार्थ्यांना समाजाच्या वतीने योग्य मार्गदर्शन वेळोवेळी केले जाईल असे उन्नती मंडळाचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी कारवाळ यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी उन्नती मंडळाचे अध्यक्ष शिवाजी कारवाळ, सचिव पंडितराव कुमावत, प्रदेश सचिव देविदास परदेशी, नाशिक तालुका अध्यक्ष अशोकराव भवरे, झोन अध्यक्ष भाऊसाहेब परदेशी, झोन सचिव बापुसाहेब कारवाळ, कैलास परदेशी, बंजरंग मित्रमंडळाचे अध्यक्ष रुपेश कुमावत, उपाध्यक्ष राकेश कारवाळ, संचालक रामचंद्र अनावडे, सातपुर विभाग प्रमुख अंकुश कुमावत, तसेच युवा कार्यकर्ते हजर होते.
 

Web Title: Honoring of meritorious people on behalf of Kumawat community