मतदान कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेविकांनी बजावली सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 01:35 AM2019-04-30T01:35:51+5:302019-04-30T01:36:11+5:30

जिल्ह्यातील तापमानाने चाळिशी ओलांडून ४२ ते ४३ अंशांपर्यंत तापमान पोहोचल्याने या कडाक्याच्या उन्हाचा मतदान कर्मचाऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून काळजी घेण्यात आली होती.

 Health careers served for polling staff | मतदान कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेविकांनी बजावली सेवा

मतदान कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेविकांनी बजावली सेवा

Next

नाशिक : जिल्ह्यातील तापमानाने चाळिशी ओलांडून ४२ ते ४३ अंशांपर्यंत तापमान पोहोचल्याने या कडाक्याच्या उन्हाचा मतदान कर्मचाऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून काळजी घेण्यात आली होती.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा परिषद अंतर्गत येणाºया सर्व मतदान केंद्रांमध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सोमवारी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य सुविधा पुरविण्याचे तसेच तालुका व इतर ग्रामस्तरीय कर्मचाºयांना मुख्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोमवारी तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका, आरोग्य सेवक आदी कर्मचारी सकाळपासूनच मतदान केंद्रात उपस्थित होते.
प्रत्येक केंद्रात आरोग्य विभागाने स्टॉल लावला होता. यामध्ये विविध प्रकारची औषधे उपलब्ध करून देण्यात आली होती. उष्माघाताबाबत मतदारांना माहिती देण्यात येत होती. आरोग्य विभागाच्या वतीने अ‍ॅम्ब्युलन्स सेवाही तयार ठेवण्यात आली होती. आरोग्य अधिकारी डॉ. डेकाटे सकाळपासून आरोग्य यंत्रणेचा आढावा घेत होते. जिल्ह्यातील विविध ठिकाणी दिव्यांग मतदारांना आरोग्य कर्मचाºयांनी व्हीलचेअरवरून मतदान केंद्रावर नेण्यासाठी मदत करण्यात येत होती. 

एका कर्मचाºयाला  किडनी स्टोनचा त्रास
मतदान कर्मचाºयांच्या आरोग्यासाठी आरोग्य विभागाकडून दक्षता घेण्यात आली. संभाव्य उष्माघाताचा त्रास तसेच अन्य दुष्परिणामांमुळे आरोग्यावर होणाºया परिणामांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन औषधो-पचाराची सज्जता ठेवण्यात आली होती. नाशिक तालुक्यातील मोहगाव येथील एका बुथवरील कर्मचारी मावळे यांना किडनी स्टोनचा त्रास झाल्याने त्यांना तातडीने शिंदे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

Web Title:  Health careers served for polling staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.