खेड-टाकेद गटात अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 01:32 IST2020-12-07T23:30:14+5:302020-12-08T01:32:52+5:30

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील खेड-टाकेद गटातील अनेक गावांमध्ये तसेच वाड्यावस्त्यांसह परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.

Greetings to the Khed-Taked group | खेड-टाकेद गटात अभिवादन

खेड टाकेद गटात महापरिनिर्वाण दिनानिमित्त परिसरातील मुलांना फळे व बिस्किटे वाटप प्रसंगी मान्यवर.dr abe

ठळक मुद्देआरोग्य केंद्रातील रुग्णांना, गरोदर महिला, माता आदींना फळे आणि बिस्किटाचे वाटप.

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील खेड-टाकेद गटातील अनेक गावांमध्ये तसेच वाड्यावस्त्यांसह परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.

इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील खेड-टाकेद गटात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमदार माणिक कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व इगतपुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे यांच्या नेतृत्वाखाली खेड-टाकेद गटातील विविध गावांतील वाड्यावस्त्यांमधील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी तसेच दलित वस्तीतील लहान मुलांना एसएमबीटी रुग्णालयातील व धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना, गरोदर महिला, माता आदींना फळे आणि बिस्किटाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी प्रत्येक गावात ठिकठिकाणी जाऊन डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन त्यांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमप्रसंगी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, उपतालुकाध्यक्ष नथु पिचड, तालुका सहसरचिटणीस सुदाम शिंदे, उपतालुकाध्यक्ष तेलोरे, गटप्रमुख वसंत भोसले, गण प्रमुख भिका पानसरे, राम शिंदे, महेश गाढवे, सोपान टोचे, पांडू गाढवे, दिलीप पोटकुले, अरुण खतेले, देवराम खतेले आदींसह विविध गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Greetings to the Khed-Taked group