अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 16:08 IST2020-08-18T15:54:34+5:302020-08-18T16:08:15+5:30

जानोरी : मोहाडी (ता. दिंडोरी) येथील अहिल्यादेवी होळकर कला, क्र ीडा व सांस्कृतिक युवा मंडळाच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

Greetings to Ahilya Devi Holkar | अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमा पूजन प्रसंगी बाकेराव मौले, ओंकार मोगरे, मनोज मोगरे, अध्यक्ष भारत ढेपले आदी.

ठळक मुद्दे युवकांनी होळकर यांच्या जीवन कार्याविषयी विचार व्यक्त केले.

जानोरी : मोहाडी (ता. दिंडोरी) येथील अहिल्यादेवी होळकर कला, क्र ीडा व सांस्कृतिक युवा मंडळाच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
प्रतिमापूजन माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बाकेराव मौले व सामाजिक कार्यकर्ते ओंकार मोगरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष भारत ढेपले यांनी केले. याप्रसंगी मान्यवर व युवकांनी होळकर यांच्या जीवन कार्याविषयी विचार व्यक्त केले. कार्यक्र मास ज्येष्ठ नागरिक कारभारी ढेपले, रामदास मोगरे, विकास सोसायटी संचालक मनोज मोगरे, धनंजय वानले, नितीन मोगरे, सुरेश दैणे, सुनील ढेपले, गजेश्वर शेंद्रे, योगेश वानले, वासुदेव ढेपले, ललित टेपले, हर्षल ढेपले, शुभम ढेपले, अविनाश जाधव, ओम मोगरे, वेदांत शेंद्रे सह समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्र माचे स्ुूत्रसंचालन अक्षय मोगरे तर आभार निखिल दैने यांनी मानले.
 

Web Title: Greetings to Ahilya Devi Holkar