शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुकाध्यक्षपदी गव्हाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 01:52 IST2021-02-18T23:03:01+5:302021-02-19T01:52:03+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यातील युवा सेनेचे पदाधिकारी बाळा गव्हाणे यांची शिवसेना मदत कक्षाच्या इगतपुरी तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. घोटी येथे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देऊन गव्हाणे यांचा सत्कार करण्यात आला.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुकाध्यक्षपदी गव्हाणे
घोटी : इगतपुरी तालुक्यातील युवा सेनेचे पदाधिकारी बाळा गव्हाणे यांची शिवसेना मदत कक्षाच्या इगतपुरी तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. घोटी येथे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देऊन गव्हाणे यांचा सत्कार करण्यात आला.
सर्वसामान्य जनतेला उत्तम आरोग्य व उपचाराच्याबाबतीत सेवा मिळावी, मार्गदर्शन मिळावे, उपचाराबाबत योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने शिवसेनेने वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना केली. माजी आमदार निर्मला गावित, काशिनाथ मेंगाळ, उपजिल्हाध्यक्ष निवृत्ती जाधव, सभापती सोमनाथ जोशी, युवा सेना अध्यक्ष मोहन ब-हे, देविदास जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख भगवान आडोळे, उप तालुकाप्रमुख कुलदीप चौधरी, गटनेते विठ्ठल लंगडे, अशोक सुरुडे, नीलेश काळे, रामदास गव्हाणे आदींनी या निवडीचे स्वागत केले आहे.