इगतपुरीत आदिवासी कुटुंबीयांना मोफत किराणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 21:04 IST2020-03-31T21:03:37+5:302020-03-31T21:04:31+5:30
इगतपुरी : कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने इगतपुरी तालुक्यातील आदिम आदिवासी जमात असणाऱ्या कातकरी कुटुंबीयांना इगतपुरी येथील जनसेवा प्रतिष्ठानतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

परदेशवाडी येथे कातकरी कुटुंबांना शिधावाटप करताना तहसीलदार अर्चना पागिरे व जनसेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी.
लोकमत न्यूज नेटवर्क
इगतपुरी : कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने इगतपुरी तालुक्यातील आदिम आदिवासी जमात असणाऱ्या कातकरी कुटुंबीयांना इगतपुरी येथील जनसेवा प्रतिष्ठानतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी तहसीलदार अर्चना पागिरे, श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांच्या हस्ते परदेशवाडी येथील कातकरी कुटुंबांना शिधावाटप करून शुभारंभ करण्यात आला. जनसेवा प्रतिष्ठानकडून तालुकाभरात विविध सामाजिक उपक्र म वर्षभर राबवण्यात येतात. हा उपक्रम राबवित असताना सोशल डिस्टन्स, साबणाने हात धुणे आणि संचारबंदी कायद्याचे कटाक्षाने पालन करण्यासाठी पागिरे यांनी प्रबोधन केले.
यावेळी नायब तहसीलदार दिनेश पाडेकर जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर, अजित पारख, पवन छाजेड, शैलेश शर्मा, जे. के. मानवेडे, आकाश खारके, सागर परदेशी, कृष्णा परदेशी, प्रकाश नावंदर, अजित बाफणा, शांतिलाल चांडक, राजेश परदेशी, अरविंद चांडक, पुरणचंद लुणावत, विजय गुप्ता, सचिन बाफणा, संतोष ठोंबरे, भगवान डोके, शांताराम भगत, रामदयाल वर्मा, पुनित चांडक आदींनी यावेळी विविध कुटुंबांना साहित्य वितरित केले.