In the four deprived leading four talukas, overcome the CPI (M) | वंचित आघाडीची चार तालुक्यांत माकपावर मात
वंचित आघाडीची चार तालुक्यांत माकपावर मात

नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या डॉ. भारती पवार यांनी एक लाख ९१ हजारांचे मताधिक्य घेत विजय मिळविला. मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाला तिसऱ्या क्रमांकाची मते पडली असली तरी, निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीचे बापू बर्डे यांनी चार विधानसभा मतदारसंघात माकपाचे जिवा पांडू गावित यांच्यापेक्षा जादा मते घेतली. आठ उमेदवारांमध्ये बर्डे चौथ्या क्रमांकावर राहिले आहेत.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात या निवडणुकीत १७ लाख २८ हजार ६५१ मतदारांपैकी ६५.६४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. गुरुवारी त्याची मोजणी करण्यात आली. त्यात भाजपाच्या भारती पवार यांनी दिंडोरी विधानसभा मतदारसंघ वगळता सर्व मतदारसंघातून मताधिक्क्य मिळविले, त्यांच्या खालोखाल शिवसेनेचे उमेदवार धनराज महाले यांनी मते घेतली. तिसºया क्रमांकावर माकपाचे जिवा पांडू गावित यांनी मते घेतली. गावित यांच्या हक्काच्या सुरगाणा-कळवण विधानसभा मतदारसंघातदेखील ते तिसºया क्रमांकावर राहिले.
विशेष म्हणजे निवडणूक प्रचारार्थ गावित यांनी सुरगाण्यापासून पायी जागर यात्रा काढून वातावरण निर्मिती केली होती. त्यांची जागर यात्रा ज्या तालुक्यातून गेली तेथेही त्यांना बर्डे यांच्यापेक्षा कमी मते मिळाली.
निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीने पहिल्यांदाच बापू बर्डे यांना रिंगणात उतरविले. बर्डे यांना ५८,८४७ इतकी मते घेतली. बहुजन विकास आघाडीचे फारसे प्राबल्य नसतानाही बर्डे यांनी नांदगावमधून (१५,४४६), चांदवड (१०,०४८), येवला (१०,८३३) व निफाडमधून (१०,६०१) मते घेतली. बर्डे यांच्यापेक्षा जिवा गावित यांना या मतदारसंघातून कमी मते मिळाली आहेत.

Web Title:  In the four deprived leading four talukas, overcome the CPI (M)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.