लायन्स क्लबला विभागीय अध्यक्षांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 00:29 IST2021-01-21T20:29:59+5:302021-01-22T00:29:51+5:30
सिन्नर : येथील लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीला लायन्स क्लबचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र पगार यांनी भेट दिली. कोविड काळात आवश्यक असणारे उपक्रम क्लबतर्फे राबविले गेल्यामुळे त्यांनी क्लबचे कौतुक केले. मेल्विन जोन्स सेवा सप्ताह कार्यक्रमाबाबत माहिती दिली.

सिन्नर लायन्स क्लबला विभागीय अध्यक्ष राजेंद्र पगार यांनी भेट दिली, त्याप्रसंगी पदाधिकारी उपस्थित होते.
सिन्नर : येथील लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीला लायन्स क्लबचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र पगार यांनी भेट दिली. कोविड काळात आवश्यक असणारे उपक्रम क्लबतर्फे राबविले गेल्यामुळे त्यांनी क्लबचे कौतुक केले. मेल्विन जोन्स सेवा सप्ताह कार्यक्रमाबाबत माहिती दिली.
बैठकीत व्यासपीठावर सिन्नर क्लबच्या अध्यक्ष डॉ. सुजाता लोहारकर, सचिव शिल्पा गुजराथी, खजिनदार संगीता कट्यारे, ट्रस्टचे अध्यक्ष हेमंत वाजे, इंडक्शन ऑफिसर डॉ. भरत गारे, महेंद्र तारगे उपस्थित होते. शिल्पा गुजराथी यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले. संगीता कट्यारे यांनी खजिनदारचा रिपोर्ट सभेपुढे मांडला.
अध्यक्ष डॉ. लोहारकर यांनी त्यांच्या काळात आतापर्यंत झालेल्या संपूर्ण उपक्रमाचा अहवाल मांडला. डॉ. गारे यांनी क्लबमध्ये यावर्षी नव्याने आलेल्या सभासदांना शपथ दिली. बबन वाजे यांनी तीन सॅनिटायझर स्टॅन्डचे वाटप केले. मनीष गुजराथी, अरूण थोरात यांनी परिचय करून दिला. अपर्णा क्षत्रिय, डॉ. विजय लोहारकर यांनी सूत्रसंचालन केले.