दिंडोरी नगरपंचायतीचा अर्थसंकल्प मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 16:21 IST2020-03-01T16:21:27+5:302020-03-01T16:21:54+5:30
दिंडोरी येथील नगरपंचायतीचा २०२०-२१ आर्थिक वर्षासाठी ५१ कोटी ३२ लाख ८१ हजार ५९३ रु पयांचा अर्थसंकल्प विशेष सभेत मंजूर करण्यात आला .

दिंडोरी नगरपंचायतीचे अंदाजपत्रक नगराध्यक्ष रचना जाधव यांनाकडे सादर करताना मुख्याधिकारी डॉ मयूर पाटील. समवेत उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, सर्व विषय समिती सभापती, नगरसेवक.
दिंडोरी : येथील नगरपंचायतीचा २०२०-२१ आर्थिक वर्षासाठी ५१ कोटी ३२ लाख ८१ हजार ५९३ रु पयांचा अर्थसंकल्प विशेष सभेत मंजूर करण्यात आला .
दिंडोरीच्या नगराध्यक्ष रचना जाधव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, सर्व विषय समित्यांचे अध्यक्ष,नगरसेवक,नगरसेविका,मुख्याधिकारी डॉ. मयूर पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी महसूल वाढीसाठी उपाययोजना करण्यावर चर्चा करण्यात आली. मुख्याधिकारी डॉ पाटील यांनी वार्षिक नियोजन अंदाजपत्रक सादर केले. या आर्थिक वर्षात महसुली उत्पन्न ३ कोटी ८६ लाख रुपये, भांडवली उत्पन्न (शासन निधी) ४४ कोटी ३० लाख रुपये,अनामती खर्च ९४ लाख २१ हजार रुपये अपेक्षित असून आरंभीची शिल्लक २लाख ६० हजार ५९६ रुपये आहे. नगरपंचायत फंडातून किमान वेतन साठी १ कोटी,सामान्य प्रशासन विभाग १ कोटी ५४ लाख ,दिवाबत्ती विभाग ९ लाख ३५ हजार,पाणीपुरवठा विभाग ४९ लाख १० हजार,साफसफाई/आरोग्य साठी १४ लाख ४४ हजार व बांधकाम विभागासाठी १ कोटी ३६ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यावेळी सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.