दिंडोरीत पुन्हा पक्षनिष्ठेला आव्हान?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 00:39 IST2019-10-07T00:39:03+5:302019-10-07T00:39:44+5:30

दिंडोरी : पेठ-दिंडोरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध नुकतेच शिवबंधन हाती बांधलेल्या दोन्ही माजी आमदारांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल असल्याने सोमवारी (दि.७) माघारीच्या दिवशी कोण पक्षनिष्ठा दाखवितो याकडे मतदारसंघाचे लक्ष लागून आहे.

Dindori again challenged party loyalty? | दिंडोरीत पुन्हा पक्षनिष्ठेला आव्हान?

दिंडोरीत पुन्हा पक्षनिष्ठेला आव्हान?

ठळक मुद्दे दिंडोरीत पुन्हा एकदा पक्षनिष्ठेलाच आव्हान

दिंडोरी : पेठ-दिंडोरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध नुकतेच शिवबंधन हाती बांधलेल्या दोन्ही माजी आमदारांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल असल्याने सोमवारी (दि.७) माघारीच्या दिवशी कोण पक्षनिष्ठा दाखवितो याकडे मतदारसंघाचे लक्ष लागून आहे.
धनराज महाले व रामदास चारोस्कर या दोहोंचे अपक्ष म्हणून अर्ज कायम आहेत. सोमवारी माघारीचा दिवस असल्याने महाले आणि चारोस्कर या दोहोंनी माघार घेतली नाही तर सेनेच्या उमेदवाराला दोन माजी आमदारांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. यापूर्वी तिकीटासाठी पक्षनिष्ठा गुंडाळून ठेवणाऱ्या या दोन्ही माजी आमदारांकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागून असून दिंडोरीत पुन्हा एकदा पक्षनिष्ठेलाच आव्हान देण्यात आले आहे.

Web Title: Dindori again challenged party loyalty?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.