टाकेद, कावनईला संचारबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 01:30 IST2021-03-10T22:30:12+5:302021-03-11T01:30:09+5:30
इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद व कावनई या तीर्थक्षेत्र परिसरात १३ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

टाकेद, कावनईला संचारबंदी
इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद व कावनई या तीर्थक्षेत्र परिसरात १३ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
या कालावधीत नागरिकांनी सदर परिसरात दर्शनासाठी गर्दी करू नये तसेच विनामास्क न फिरता कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्याचे प्रांताधिकारी तेजस चव्हाण तसेच घोटी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी केले आहे.
महाशिवरात्री काळात मंदिरातील दैनंदिन पूजाविधी सुरूच राहणार असून महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी सामाजिक व्यक्तींकडून विविध फळे, फराळ, पाण्याच्या बाटल्या आदीं वाटप करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तरी या दोन्हीही तीर्थक्षेत्र परिसरात तीन दिवस कोणीही येऊ नये, असे आवाहन सरपंच ताराबाई बांबळे यांनी दिली आहे.
फोटो- १० कावनई टाकेद
सर्वतीर्थ टाकेद परिसरात पोलिस प्रशासनाकडून करण्यात आलेले बॅरिकेडिंग.