भाजपाच्या त्या निर्णयामुळे नाशिकमध्ये आमदार पुत्रांची उमेदवारी अडचणीत
By संजय पाठक | Updated: December 29, 2025 17:52 IST2025-12-29T17:51:56+5:302025-12-29T17:52:21+5:30
Nashik Municipal Corporation Election: भाजपाच्या प्रदेश नेत्यांनी कोणत्याही आमदारांच्या मुला मुलींना उमेदवारी दिली जाणार नाही असे जाहिर केले असून तसे फोनही पक्षाच्या नेत्यांना आल्याने आमदार देवयानी फरांदे यांचा मुलगा अंजिक्य आणि आमदार सीमा हिरे यांची कन्या रश्मी हिरे बेंडाळे यांची उमेदवारी अडचणीत आली आहे.

भाजपाच्या त्या निर्णयामुळे नाशिकमध्ये आमदार पुत्रांची उमेदवारी अडचणीत
- संजय पाठक
नाशिक - भाजपाच्या प्रदेश नेत्यांनी कोणत्याही आमदारांच्या मुला मुलींना उमेदवारी दिली जाणार नाही असे जाहिर केले असून तसे फोनही पक्षाच्या नेत्यांना आल्याने आमदार देवयानी फरांदे यांचा मुलगा अंजिक्य आणि आमदार सीमा हिरे यांची कन्या रश्मी हिरे बेंडाळे यांची उमेदवारी अडचणीत आली आहे.
आमदार फरांदे यांचे पुत्र अजिंक्य यांनी प्रभाग क्रमांक ७ मधून ओबीसी गटातून अर्ज दाखल केला होता. तर आमदार हिरे यांच्या कन्या रश्मी यांनी सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ८ मधून ओबीसी महिला याच प्रवर्गातून अर्ज दाखल केला होता. या दोघांनी सुध्दा गेल्या देान ते तीन वर्षांपासून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु आता आज अर्ज दाखल केल्यानंतर ऐनवेळी पक्ष कार्यालयाकडन निरोप देण्यात आल्याने या दोघांची उमेदवारी अडचणीत आली आहे. दरम्यान, ऐनवेळी सांगितल्याने आ या प्रभागातील चौघा भाजप इच्छूक उमेदवारांची देखील आता अडचण होण्याची शक्यता आहे.