भगूरला आढळला शामिलिन लिझर जातीचा सरडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 01:12 IST2020-09-29T23:41:34+5:302020-09-30T01:12:05+5:30
देवळाली कँम्प: -भगूर पोलीस चौकी जवळ मंगळवारी सकाळी रस्त्याच्या दुभाजकावर शामिलिन लिझर जातीचा सरडा आढळला असून त्याला बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

भगूरला आढळला शामिलिन लिझर जातीचा सरडा
देवळाली कँम्प: -भगूर पोलीस चौकी जवळ मंगळवारी सकाळी रस्त्याच्या दुभाजकावर शामिलिन लिझर जातीचा सरडा आढळला असून त्याला बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
सदर सरडा फक्त झाडावर वावर असतो तो सरडा भगूर पोलीस चौकी समोरील क्रॉंकीटीकरण रस्तावर दिसताच ये जा करणारे अनेक नागरिक मोठा व वेगळाच सरडा बघून मोबाईल मध्ये फोटो काढून घेत होते. शमेलियन सरडा दाट झाडांवरच आढळून येतो.अनेक ठिकाणी झाडे तोडल्यामुळे व कीटक नाशक वापरल्यामुळे संख्या खूप कमी झाल्याचे प्राणी मित्र रोहन जगताप यांनी सांगितले. साडेबारा वाजेच्या दरम्यान वननिभागाचे वनरक्षक विजय पाटील, प्राणिमीत्र रोहन जगतात ,आशिष पवार, मनोज जगताप,प्रथमेश भवार व मंगेश परदेशी यांच्या सहकार्याने त्याला आदिवसी भागात सोडण्यात आले. सदर शामिलिन लिझर जातीचा सारडा आदिवासी पट्यात पावसाळ्यात आढळतो.