घोटी रुग्णालयाला चार इन्व्हर्टरसह बॅटरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 00:14 IST2021-06-02T20:15:46+5:302021-06-03T00:14:47+5:30
घोटी : कोरोनाच्या संकट काळात इगतपुरी तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण व आरोग्य यंत्रणेला साहाय्य करणाऱ्या माजी जि. प. सदस्य गोरख बोडके यांनी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रुग्णांची गैरसोय होऊ नये व उपचार प्रक्रियेत व्यत्यय निर्माण होऊ नये, म्हणून घोटी ग्रामीण रुग्णालयाला उच्च क्षमतेच्या चार बॅटरी इन्व्हर्टरसह उपलब्ध करून दिल्या आहेत.

घोटी रुग्णालयाला चार इन्व्हर्टरसह बॅटरी
ठळक मुद्देरुग्णालयाची गरज ओळखून बोडके यांनी ही मदत केली.
घोटी : कोरोनाच्या संकट काळात इगतपुरी तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण व आरोग्य यंत्रणेला साहाय्य करणाऱ्या माजी जि. प. सदस्य गोरख बोडके यांनी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रुग्णांची गैरसोय होऊ नये व उपचार प्रक्रियेत व्यत्यय निर्माण होऊ नये, म्हणून घोटी ग्रामीण रुग्णालयाला उच्च क्षमतेच्या चार बॅटरी इन्व्हर्टरसह उपलब्ध करून दिल्या आहेत.
घोटी ग्रामीण रुग्णालयाच्या मागणीवरून व रुग्णालयाची गरज ओळखून बोडके यांनी बुधवारी (दि.२) ही मदत केली. यावेळी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.सदावर्ते व डॉ.गोरे, बाजार समितीचे प्रशासक मंडळातील नंदलाल भागडे, तुकाराम वारघडे, भोर यांच्यासह टिटोलीचे उपसरपंच अनिल भोपे, राजेंद्र वालतुले, तुषार बोथरा, सचिन तारगे आदी उपस्थित होते.