इगतपुरीत बंदला नागरिकांची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 23:49 IST2020-03-22T23:49:34+5:302020-03-22T23:49:56+5:30
इगतपुरी : तालुक्यात रविवारी कोरोना विषाणूवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जनता कर्फ्यूला इगतपुरी शहरासह घोटी बाजारपेठही पूर्णपणे शंभर टक्के बंद होती. इगतपुरी व घोटी शहरात रस्त्यावर सकाळपासूनच शुकशुकाट पसरला होता. किराणा दुकाने, जनरल स्टोअर्स बंद होती. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सर्वच नागरिकांनी आपल्या परिवारासोबत घरी राहणे पसंद केले.

इगतपुरीत बंदला नागरिकांची साथ
इगतपुरी रेल्वेस्थानकावर असलेला शुकशुकाट.
लोकमत न्यूज नेटवर्क
इगतपुरी : तालुक्यात रविवारी कोरोना विषाणूवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जनता कर्फ्यूला इगतपुरी शहरासह घोटी बाजारपेठही पूर्णपणे शंभर टक्के बंद होती. इगतपुरी व घोटी शहरात रस्त्यावर सकाळपासूनच शुकशुकाट पसरला होता. किराणा दुकाने, जनरल स्टोअर्स बंद होती. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सर्वच नागरिकांनी आपल्या परिवारासोबत घरी राहणे पसंद केले.
इगतपुरी शहरात रविवारी सकाळपासून नगर परिषदेकडून कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय म्हणून खालची पेठ, भाजी मार्केट, लोया रोड, गांधी चौक, तीनलकडी, जोगेश्वरी आदी सर्व भागात फवारणी करण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाचे यशवंत ताठे, नगरसेवक दिनेश कोळेकर, आशा सोनवणे, मुकादम सदानंद शेळके, आदी कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
तर नागरिकांनी रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने जनता कर्फ्यूमुळे आपल्या परिवारासोबत टीव्ही बघण्यात तसेच जुनी पुस्तके काढून वाचन, मोबाइलद्वारे विविध (पीडीएफ) डाउनलोड करून वाचण्यात दिवस घालविला तर काही इतर नातेवाइकांना फोन करून प्रत्येक गावाची परिस्थिती माहिती घेत होते. खेडेगावातील दुकाने यावेळी बंद ठेवण्यात आली होती.खानपान सेवा बंद महामार्ग बंद, सर्वाधिक वर्दळ असलेल्या नाशिक-मुंबई महामार्गावरही रविवारी सकाळपासून एकही वाहन दिसत नव्हते. महामार्गावर घोटी टोल नाक्यावर एकदम शुकशुकाट पसरला होता तर रेल्वेस्थानकावर अनेक गाड्या रद्द असल्याने सर्व खानपान सेवा बंद होती. पूर्णपणे शुकशुकाट पसरला होता. एकही गाडी दिसत नव्हती तसेच प्रवासीही दिसत नव्हते मात्र मुंबईकडे जाणाऱ्या गाडीमध्ये किरकोळ प्रवासी दिसत होते. तसेच बसेस, टॅक्सी, रिक्षा पूर्णपणे बंद होत्या.