मध्य मतदारसंघात २९५ केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 00:54 IST2019-10-21T00:54:07+5:302019-10-21T00:54:31+5:30

नाशिक मध्य मतदारसंघातील २९५ मतदान केंद्रांवर साहित्य पुरविण्यात आले. दादासाहेब गायकवाड सभागृह येथे सकाळी साहित्य घेण्यासाठी कर्मचारी उपस्थित झाले होते. मतदारसंघातील २९५ ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रांवर साहित्य घेऊन कर्मचारी रवाना झाले आहेत.

194 centers in the central constituency | मध्य मतदारसंघात २९५ केंद्र

मध्य मतदारसंघात २९५ केंद्र

नाशिक : नाशिक मध्य मतदारसंघातील २९५ मतदान केंद्रांवर साहित्य पुरविण्यात आले. दादासाहेब गायकवाड सभागृह येथे सकाळी साहित्य घेण्यासाठी कर्मचारी उपस्थित झाले होते. मतदारसंघातील २९५ ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रांवर साहित्य घेऊन कर्मचारी रवाना झाले आहेत.
येथील कामकाजाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे उपस्थित होते. त्यांनीही यावेळी कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट तसेच कंट्रोल युनिटचा कर्मचाऱ्यांनी ताबा घेतला. मतदान केंद्रांवर लावण्यात सूचना पत्रकांपासून ते मतदानाच्या साहित्यांसह कर्मचारी बसेसच्या माध्यमातून रवाना झाले.
साधारणपणे २७०० कर्मचारी या मतदारसंघात निवडणूक कर्मचारी म्हणून कामकाज पाहणार आहेत. ३६५ पोलीस अधिकारी कर्मचाºयांवर बंदोबस्ताची जबाबदारी आहे. रविवारी रात्रीच या कर्मचाºयांनी केंद्राचा ताबा घेतला आहे.

Web Title: 194 centers in the central constituency