वीजजोडणी नसताना १२ हजारांचे बिल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 01:04 IST2020-08-24T21:32:57+5:302020-08-25T01:04:53+5:30
येवला : तालुक्यातील अंगुलगाव शिवारात वीज वितरणने वीजजोडणी नसताना विधवा शेतकरी महिलेला तब्बल १२ हजार ८० रुपयांचे बील अकारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

बोडखे यांना ्रआलेले १२ हजार रुपयांचे बील.
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : तालुक्यातील अंगुलगाव शिवारात वीज वितरणने वीजजोडणी नसताना विधवा शेतकरी महिलेला तब्बल १२ हजार ८० रुपयांचे बील अकारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
अंगुलगाव येथील लताबाई सुधाकर बोडखे यांनी ६ जून २०१४ मध्ये कृषिपंपासाठी कोटेशन भरले होते. त्यांच्याकडे खांब व डीपी फेब्रुवारी २०२० मध्ये बसविण्यात आली. वीजजोडणी झालेली नव्हती. वीजजोडणीसाठी फोनवर व प्रत्यक्ष संबंधित वायरमन यांच्याशी त्यांनी संपर्ककेला. मात्र, त्यांनी टाळाटाळ केली. आजही त्यांना वीजजोडणी झालेली नाही.
दरम्यान, बोडखे यांच्या मुलाने आॅनलाइन चेक केले असता जोडणी नसतानाही त्यांना तब्बल ६ हजार ५५३ इतके युनिट दाखवून १२ हजार ८० रु पये इतके बिल आकारल्याचे दिसून आले. प्रत्यक्षात जोडणी नसताना वीजबिल आलेच कसे, असा प्रश्न बोडखे यांना पडला आहे.
यासंदर्भात येवला शहर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता देवीदास इंगळे यांच्याशी संपर्क साधला असता, याप्रकरणी तांत्रिक दोषामुळे मीटरवाचन व बील आकारले गेले आहे.
संबंधित ग्राहकाला वीजजोडणी देण्यात आली असून, बील दुरुस्ती करून दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.