बंधाऱ्यात आढळल्या १० मृत पाणकोंबड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 18:44 IST2021-01-13T18:42:21+5:302021-01-13T18:44:01+5:30
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील दातली येथील तलावात दहा पाणकोंबड्या व एक बगळा मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ह्यबर्ड फ्लह्ण च्या पार्श्वभूमीवर अकरापक्षी मृत अवस्थेत आढळल्याने प्रशासन सतर्क झाले असून मृत पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पशुधन खात्याच्या पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्या आहेत.

बंधाऱ्यात आढळल्या १० मृत पाणकोंबड्या
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील दातली येथील तलावात दहा पाणकोंबड्या व एक बगळा मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ह्यबर्ड फ्लह्ण च्या पार्श्वभूमीवर अकरापक्षी मृत अवस्थेत आढळल्याने प्रशासन सतर्क झाले असून मृत पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पशुधन खात्याच्या पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्या आहेत.
दातली येथील लघुपाटबंधारे विभागाच्या बंधाऱ्यात यावर्षी चांगले पाणी आले आहे. या बंधाऱ्यात काही नागरिक मासे पकडत असतांना त्यांना पाण्यावर पाणकोंबड्या मृत अवस्थेत तरंगत असल्याच्या आढळून आल्या. त्यांनी या घटनेची माहिती पशुधन विभागाला दिली. तालुका पशुधन अधिकारी डॉ. मिलिंद भणगे यांच्या मार्गदर्शनाखाली वावीचे पशुधन अधिकारी डॉ. अरविंद पवार, वडांगळीचे डॉ. योगेश दुबे यांनी घटनास्थळी जावून धाव घेतली. व घटनेची माहिती वनविभागाला दिली.
वनपरिमंडळ अधिकारी अनिल साळवे यांच्यासह राजाराम उगले, तुकाराम डावरे, रामनाथ सहाणे, बालम शेख यांच्यासह वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही विभागाने ग्रामस्थांसमवेत होडीच्या मदतीने मृत पाणकोंबड्या बांधाऱ्यातून बाहेर काढल्या.
यावेळी १० पाणकोंबड्यासह एक बदक मृत अवस्थेत आढळून आला. यातील तीन पाणकोंबड्या पशुधन खात्याच्या पश्चिम विभागीय रोग निदान पुणे प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्या, तसेच गरज पडल्यास भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
हिमाचल, राजस्थान पाठोपाठ महाराष्ट्रलगतच्या मध्ये प्रदेशात बर्ड फ्लूची लागण झाल्याने राज्यातील पोल्ट्री व्यायसायिक धास्तावले आहेत. बर्ड फ्लूूचे संकट टाळण्यासाठी प्रत्येक राज्याकडून खबरदारी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर दहा पाणकोंबड्या मृत आढळून आल्याने सतर्कता म्हणून सदर मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.