मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळावे: नारायण राणे

By मनोज शेलार | Updated: November 24, 2023 18:46 IST2023-11-24T18:44:47+5:302023-11-24T18:46:29+5:30

मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळावे ही आपली भूमिका असल्याचे प्रतिपादन नारायण राणेंनी केले.

maratha community should get 16 percent reservation said minister Narayan Rane | मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळावे: नारायण राणे

मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळावे: नारायण राणे

नंदुरबार : मराठ्यांना यापूर्वी दिलेले १६ टक्के आरक्षण मिळावे ही आपली भूमिका असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नंदुरबार येथे बोलताना केले. विकसित भारत संकल्प यात्रेसंदर्भातील योजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्री राणे शुक्रवारी नंदुरबारात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. त्यांनी सांगितले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपली पूर्वीपासूनची भूमिका आहे. 

यापूर्वी समाजाला मिळालेले १६ टक्के आरक्षण यावेळीही मिळावे असे त्यांनी सांगितले. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मकाऊ येथील फोटो व व्हिडीओ ट्वीट केले आहेत. त्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, राऊत हे बेताल वक्तव्य करीत आहेत. ते लोकहिताचे, जनहिताचे काहीही बोलत नाहीत. त्यांच्या वक्तव्यांकडे फारसे गांभीर्याने पाहण्यासारखे काहीही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

Web Title: maratha community should get 16 percent reservation said minister Narayan Rane