नंदुरबारमध्ये एकाच रात्री एकाच ठिकाणाहून चार दुचाकी लंपास

By मनोज शेलार | Updated: May 4, 2023 17:21 IST2023-05-04T17:20:50+5:302023-05-04T17:21:09+5:30

शहादा पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Four two-wheeler lampas from the same place in the same night in nandurbar | नंदुरबारमध्ये एकाच रात्री एकाच ठिकाणाहून चार दुचाकी लंपास

नंदुरबारमध्ये एकाच रात्री एकाच ठिकाणाहून चार दुचाकी लंपास

नंदुरबार : लोणखेडा, ता. शहादा येथील गोपाळनगर भागातून एकाच वेळी चार दुचाकी चोरीस गेल्याची घटना ३ मे रोजी रात्री घडली. याप्रकरणी शहादा पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिस सूत्रांनुसार, लोणखेडा, ता. शहादा येथील गोपाळनगर भागातून तुळशीराम ओंकार पाटील (४३) या किराणा दुकान व्यापाऱ्याच्या घराबाहेर दुचाकी उभ्या केल्या होत्या. चोरट्यांनी ३ मे रोजी रात्री चार दुचाकी चोरून नेल्या. त्यात तुळशीराम पाटील यांच्यासह गणेश अंबे, मुरूगेशन चित्रा थामबी व संदीप रवींद्र माळी यांच्या दुचाकींचा समावेश आहे. सकाळी पाटील व इतर जणांना त्यांच्या दुचाकी अंगणात दिसल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी इतरत्र शोध घेतला असता मिळून आल्या नाहीत. त्यामुळे त्यामुळे तुळशीराम पाटील यांनी शहादा पोलिसांत फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार छगन चव्हाण करीत आहेत.

Web Title: Four two-wheeler lampas from the same place in the same night in nandurbar