शेतीच्या वादातून गोळीबार, दोन जण ठार, शहादा तालुक्यातील घटना
By मनोज.आत्माराम.शेलार | Updated: July 27, 2023 16:57 IST2023-07-27T16:56:26+5:302023-07-27T16:57:03+5:30
गावठी पिस्तूलचा एका गटाकडून वापर करण्यात आला.

शेतीच्या वादातून गोळीबार, दोन जण ठार, शहादा तालुक्यातील घटना
नंदुरबार: शहादा तालुक्यातील मलगाव येथे दोन कुटुंबातील शेतीच्या वादातून गोळीबार करण्यात आला. त्यात गोळी लागून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. गावठी पिस्तूलचा एका गटाकडून वापर करण्यात आला. दुस-या गटाने तलवारीचा वापर केला. गुरूवारी दुपारी ही घटना घडली.
शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मयतांमध्ये अविनाश सखाराम खरडे (30) व रामसिंग कलसींग खरडे (54) अशी मयतांची नावे आहेत. घटनेत 3जण जखमी झाले आहेत.