शॉकिंग! डाकीण समजून जमावाने महिलेसह तिच्या पतीला खाऊ घातली स्मशानातील राख

By मनोज शेलार | Updated: September 21, 2023 17:52 IST2023-09-21T17:50:30+5:302023-09-21T17:52:01+5:30

मोलगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरिक्षक दिपक बुधवंत करीत आहे.

Claiming to be Dakin, the mob ate the ashes of the woman and her husband in nandurbar | शॉकिंग! डाकीण समजून जमावाने महिलेसह तिच्या पतीला खाऊ घातली स्मशानातील राख

शॉकिंग! डाकीण समजून जमावाने महिलेसह तिच्या पतीला खाऊ घातली स्मशानातील राख

मनोज शेलार/नंदुरबार

नंदुरबार : जादूटोणा करून युवक व महिलेला मारून टाकल्याचा आरोप करीत स्मशानभूमीत नेऊन राख खाऊ घालत महिलेला व तिच्या पतीला वेगवेगळ्या ठिकाणी तांत्रिक पूजा केल्याची घटना १६ ते १९ सप्टेंबर दरम्यान ओघाणी,ता.अक्कलकुवा येथे घडली. याबाबत मोलगी पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओघाणीचा चापडापाडा, ता.अक्कलकुवा येथील ५० वर्षीय महिलेवर संशय घेऊन तिने जादूटोणा करून ओजमा नवसा वसावे यांच्या मुलाला व खेमा नवसा वसावे यांच्या पत्नीला मारल्याचा संशय घेऊन जमावाने महिला व तिच्या पतीला गावात त्रास देणे सुरू केले. पती-पत्नीला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन त्यांना तांत्रिक पूजा करायला भाग पाडले. तसेच स्मशानात घेऊन जाऊन राख खाऊ घातली. या सर्व प्रकाराला कंटाळलेल्या व प्रचंड दहशतीत आलेल्या महिलेने व तिच्या पतीने अखेर पोलिस ठाणे गाठले. तेथे आपबिती कथन केल्यानंतर फिर्याद दाखल केली. महिलेच्या फिर्यादीवरून ओजमा नवसा वसावे (५८), गुला ओजमा वसावे (३०), ईल्या ओजमा वसावे (२८), खेमा नवसा वसावे (५२), चंद्रसिंग खेमा वसावे (२७) सर्व रा.ओघाणीचा चापडापाडा, ता.अक्कलकुवा व बावा ओल्या पाडवी (५५) रा.लहान अक्कलकुवा, ता.अक्कलकुवा यांच्याविरुद्ध मोलगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरिक्षक दिपक बुधवंत करीत आहे.

Web Title: Claiming to be Dakin, the mob ate the ashes of the woman and her husband in nandurbar