दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मारहाण; दोन जण जखमी
By रमाकांत.फकीरा.पाटील | Updated: April 26, 2023 18:20 IST2023-04-26T18:20:32+5:302023-04-26T18:20:54+5:30
दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून झालेल्या मारहाणीत दोनजण जखमी झाल्याची घटना घडली.

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मारहाण; दोन जण जखमी
नंदुरबार: दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून झालेल्या मारहाणीत दोनजण जखमी झाल्याची घटना मोलगीचा उखल्लीपाडा (ता. अक्कलकुवा) येथे घडली. याप्रकरणी मोलगी पोलिसांत एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोलगीचा उखल्लीपाडा येथील वीरसिंग पेवजी तडवी यांच्याकडे सुल्तान उताण्या वळवी (३४, रा. मोलगीचा भगतफळीपाडा) याने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. वीरसिंग यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर दोघांमध्ये बाचाबाची झाली.
रागाच्या भरात सुलतान याने लाकडी दांडका घेऊन मारहाण केली. त्यावेळी मगन सामा वळवी (३३) हा देखील सोडविण्यासाठी गेला असता त्याला देखील बेदम मारहाण करण्यात आली. त्यात वीरसिंग व मगन यांना हातापायांवर व डोक्यावर मार लागल्याने ते जखमी झाले. याबाबत वीरसिंग तडवी यांनी फिर्याद दिल्याने सुलतान वळवी (३४) याच्याविरुद्ध मोलगी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस कर्मचारी उमेश चौधरी करीत आहेत.