गुजरातमध्ये जाणाऱ्या मद्यसाठ्यासह ८९ लाखांचा मुद्देमाल जप्त

By मनोज शेलार | Updated: April 17, 2023 18:45 IST2023-04-17T18:45:03+5:302023-04-17T18:45:11+5:30

१५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

89 lakh worth of goods seized including liquor going to Gujarat | गुजरातमध्ये जाणाऱ्या मद्यसाठ्यासह ८९ लाखांचा मुद्देमाल जप्त

गुजरातमध्ये जाणाऱ्या मद्यसाठ्यासह ८९ लाखांचा मुद्देमाल जप्त

मनोज शेलार/नंदुरबार : गुजरातमध्ये जाणारा पाच लाख ६९ हजार रुपयांचा मद्यसाठा, दोन लाख ७८ हजार रुपयांची रोख रक्कम व १७ वाहने पोलिसांच्या भरारी पथकाने नवापुरात जप्त केली. रविवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवापुरातून गुजरातमध्ये खाजगी वाहनांमधून दारूसाठा नेला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस महानिरीक्षकांच्या भरारी पथकाने नवापुरातील गणेश टेकडी परिसरात धाड टाकून कारवाई केली. तेथे पोलिसांना ५ लाख ६९ हजार १०५ रुपयांचा देशीविदेशी मद्यसाठा, २ लाख ७८ हजार ३९० रूपये रोख, १७ चारचाकी व दुचाकी वाहने असा एकूण ८९ लाख २ हजार ४९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली असून मूळ सूत्रधारांपर्यंत पोलिसांनी पोहोचावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: 89 lakh worth of goods seized including liquor going to Gujarat