३० वर्षांचा अनुभव व कार्य हाच प्रचाराचा मुद्दा : आमदार के.सी.पाडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:21 PM2019-03-28T12:21:04+5:302019-04-04T12:26:15+5:30

एकसंघतेने काँग्रेस पक्ष निवडणुकीला सामोरा जातोय

30 years of experience and work is the only campaign: MLA K. C. Padhvi | ३० वर्षांचा अनुभव व कार्य हाच प्रचाराचा मुद्दा : आमदार के.सी.पाडवी

३० वर्षांचा अनुभव व कार्य हाच प्रचाराचा मुद्दा : आमदार के.सी.पाडवी

Next

नंदुरबार : आमदार या नात्याने ३० वर्षे शहादा, अक्कलकुवा आणि धडगाव या विधानसभा मतदारसंघात केलेली विकास कामे जनतेसमोर आहेत. त्यामुळे या कामाच्या बळावर आणि काँग्रेससारख्या धर्मनिरपेक्ष आणि दलित, आदिवासी समाजासाठी तळमळीने काम करणाऱ्या पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्याच्या सहकार्याने नंदुरबार लोकसभा मतदारसंघातूून निवडणूक लढवत असल्याची माहिती काँग्रेसचे उमेदवार आमदार अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत दिली.
‘लोकमत’च्या ‘चाय पे चर्चा’ उपक्रमात सहभागी झालेल्या आमदार अ‍ॅड.पाडवी यांनी काँग्रेसची उमेदवारी, प्रचाराचे मुद्दे, लोकसभा मतदारसंघासाठीचे व्हीजन, संघटनात्मक प्रयत्न याविषयी बातचित केली.
प्रश्न : आमदार असताना लोकसभा निवडणुकीकडे वळण्याचे कारण ?
आ.के.सी.पाडवी : नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. इंदिराजी गांधी या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात या मतदारसंघापासून करीत असत. ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावीत यांनी अनेक वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व केले. परंतु, गेल्यावेळी हा मतदारसंघ काँग्रेसच्या हातून गेला. तो पुन्हा मिळविण्यासाठी सर्व नेत्यांनी माझे नाव एकमताने सुचविले. पक्षाचा निष्ठावंत सैनिक या नात्याने मी तो आदेश शिरसावंद्य मानला आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलो.
प्रश्न : आपले प्रचाराचे मुद्दे काय राहणार आहेत?
आ.के.सी.पाडवी : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेस पक्षाने केलेली कामे आणि गेल्या पाच वर्षात भाजपाच्या काळात झालेली कामे यांची तुलनात्मक स्थिती आम्ही मतदारांपुढे मांडणार आहोत. ज्येष्ठ नेते स्व.पी.के.अण्णा पाटील यांच्या सान्निध्यात राहण्याचा योग आला. त्यामुळे सिंचनाच्या कामाची दृष्टी मला मिळाली. विधानसभा मतदारसंघात सिंचनाची मोठी कामे मी करु शकलो. तेही मांडणार आहोत.
प्रश्न : भाजपाच्या पाच वर्षातील कार्यकाळाचे मूल्यमापन लोकप्रतिनिधी आणि प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून तुम्ही कसे कराल?
आ.के.सी.पाडवी : भाजपाच्या पाच वर्षातील कार्यकाळात नंदुरबार लोकसभा मतदारसंघात कोणतेही भरीव काम झालेले नाही. ज्येष्ठ नेते माणिकराव गावीत यांच्या कार्यकाळात मंजूर झालेली, कार्यादेश दिलेली विकास कामेच या पाच वर्षांत पूर्ण झाली आहेत. विद्यमान खासदार जुन्या कामांचे श्रेय स्वत: घेत आहेत. मात्र जनतेला सत्य माहिती आहे. त्यामुळे आम्ही आमच्या विकास कामांची माहितीच मतदारांपुढे नेणार आहोत. प्रमुख मुद्दा म्हणजे, वनविभागाच्या परवानगीसाठी अडून राहिलेली सिंचन, रस्ते आणि वीज प्रकल्पांची कामे मार्गी लावण्यासाठी केलेले प्रयत्न, त्याचा दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना झालेला लाभ, मुंबई ते दिल्लीपर्यंत केलेला पाठपुरावा हे सगळे जनतेपुढे असल्याने विरोधकांनी कितीही भूलथापा मारल्या तरी जनता काँग्रेसवर विश्वास ठेवेल, याची खात्री आहे. प्रश्न: नंदुरबार आणि कॉंग्रेसचे ऋणानुबंध या मुद्यावर भर राहील ?
आमदार के.सी.पाडवी : निश्चितच. आदिवासी जनतेने माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्यावर अलोट प्रेम केले. गांधी परिवार आणि कॉंग्रेस पक्षाने आदिवासी जनता आणि येथील मतदारांना भरपूर काही दिले. या ऋणानुबंधाला पुन्हा उजाळा दिला जाईल.

Web Title: 30 years of experience and work is the only campaign: MLA K. C. Padhvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.