नांदेडमध्ये मतदान केंद्र परिसरात पैसे वाटणाऱ्याविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 22:21 IST2019-10-21T22:19:43+5:302019-10-21T22:21:44+5:30
पैसे वाटप करीत असलेल्या एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेडमध्ये मतदान केंद्र परिसरात पैसे वाटणाऱ्याविरुद्ध गुन्हा
नांदेड : शहरातील गुरुद्वारा भागात असलेल्या एका मतदान केंद्र परिसरात पैसे वाटप करीत असलेल्या एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरारी पथकाच्या तक्रारीवरुन ही कारवाई केली आहे.
विधानसभा निवडणुकीत सोमवारी मतदान प्रक्रिया सुरू असताना नांदेड शहरात गुरुद्वारा चौरस्त्यावर गुलशन ज्युस सेंटरसमोर सकाळी ११.३० च्या सुमारास सरदार जसप्रितसिंघ मनजितसिंघ खालसा (रा. नगिनाघाट) हा मतदारांना पैसे वाटप करत होता. नांदेड तहसील कार्यालयाच्या भरारी पथक क्र. ३ चे गुलाम मोहमद सादिक यांनी जसप्रितसिंघ खालसा याला पकडले. त्याच्याकडून मतदान चिठ्या आणि रोख पाच हजार रुपये जप्त करण्यात आले. या प्रकरणी गुलाम सादिक यांच्या तक्रारीवरुन वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक बडे हे करीत आहेत.