नांदेडमध्ये ४९१ उमेदवार, खर्च मर्यादा ९ लाख; ४४ कोटींच्या 'दौलतजादा'चा अंदाज !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 19:14 IST2026-01-13T19:14:20+5:302026-01-13T19:14:51+5:30
शासकीय नियमास बांधील राहून उमेदवारांनी बांधला निवडणूक खर्चाचा ताळेबंद

नांदेडमध्ये ४९१ उमेदवार, खर्च मर्यादा ९ लाख; ४४ कोटींच्या 'दौलतजादा'चा अंदाज !
नांदेड : नांदेड महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर आता खऱ्या अर्थाने पैशांचा खेळ सुरू झाला आहे. यंदाच्या निवडणुकीत तब्बल ४९१ उमेदवार आपले नशीब आजमावत असून, त्यांच्या खर्चावर राज्य निवडणूक आयोगाचे बारीक लक्ष आहे. नांदेड महानगरपालिकेचा समावेश 'ड' वर्गात होत असल्याने, आयोगाने प्रत्येक उमेदवारासाठी ९ लाख रुपयांपर्यंत खर्चाची अधिकृत मर्यादा निश्चित केली आहे.
गणिताचा विचार केला, तर एका उमेदवाराने सरासरी ९ लाख रुपये खर्च केले तरी एकूण ४९१ उमेदवारांचा खर्च तब्बल ४४ कोटी १९ लाख रुपयांच्या घरात जातो. जर काहींनी छुप्या मार्गानेखर्च वाढवला, तर हा आकडा ५० या अवाढव्य खर्चामुळे निवडणुकीत कोटींच्याही पुढे जाण्याची शक्यता आहे. मोठी आर्थिक उलाढाल होणार असून, प्रचार साहित्य, रॅली, जाहिराती आणि कार्यकर्त्यांच्या चंगळीवर कोटींची 'दौलतजादा' होणार असल्याचे स्पष्ट चित्र आहे. वाढत्या उमेदवार संख्येमुळे यंदा नांदेडची निवडणूक राज्याच्या इतिहासातील सर्वात महागड्या निवडणुकांपैकी एक ठरू शकते.
मर्यादेत खर्चुनही ४४ कोटींची 'दौलतजादा' होणार
जर सर्व ४९१ उमेदवारांनी आयोगाच्या ९ लाखांच्या मर्यादेपर्यंत खर्च केला, तर एकूण खर्च ४४ कोटी १९ लाख रुपयांच्या घरात जातो. हा आकडा शहराच्या अर्थव्यवस्थेत निवडणुकीच्या काळात होणाऱ्या मोठ्या उलाढालीचा पुरावा आहे.
महापालिकेसाठी ४९१ उमेदवार रिंगणात
नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीत विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष मिळून एकूण ४९१ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. उमेदवारांची ही मोठी संख्या पाहता यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि खर्चिक होणार असल्याचे स्पष्ट आहे.
दिवसांच्या आत ३० हिशेब द्यावा लागणार
निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत प्रत्येक उमेदवाराला आपल्या संपूर्ण निवडणूक खर्चाचा अंतिम हिशेब आणि प्रतिज्ञापत्र निवडणूक विभागाकडे सादर करावे लागते. हिशेब सादर न करणाऱ्या उमेदवाराला भविष्यात निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले जाऊ शकते.