वाघिणीचा तिसरा बछडाही विषप्रयोगाचा बळी, वन्यप्रेमींकडून संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2021 06:25 PM2021-01-02T18:25:39+5:302021-01-02T18:27:26+5:30

वाघिणीसह दोन बछडे मृत झाल्याची घटना 1 जानेवारीला दुपारी उघडकीस आली होती. तिथेच अर्धवट खाल्लेली गाय आढळली होती. त्या गाईवर विषप्रयोग केला असण्याची शक्यता असल्याने चौकशीसाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची चमू आज दाखल झाली होती.

Waghini's third calf also poisoned, outraged by wildlife lovers in nagpur umarkhed karhad | वाघिणीचा तिसरा बछडाही विषप्रयोगाचा बळी, वन्यप्रेमींकडून संताप

वाघिणीचा तिसरा बछडाही विषप्रयोगाचा बळी, वन्यप्रेमींकडून संताप

Next
ठळक मुद्देवाघिणीसह दोन बछडे मृत झाल्याची घटना 1 जानेवारीला दुपारी उघडकीस आली होती. तिथेच अर्धवट खाल्लेली गाय आढळली होती. त्या गाईवर विषप्रयोग केला असण्याची शक्यता असल्याने चौकशीसाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची चमू आज दाखल झाली होती.

नागपूर : उमरेड कऱ्हाड अभयारण्यात कऱ्हाडला बिट येथे वाघीण व तिच्या दोन बछड्यांचा शुक्रवारी मृत्यू झाला होता. यापाठोपाठ आज तिसरा बछडाही मृतावस्थेत आढळला. त्यामुळे या घटनेला अधिकच गंभीर वळण मिळाले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्यादिवशी वाघीणीसह तिच्या दोन बछड्यांचा जीव गेल्याने सर्वांकडून हळहळ व्यक्त करण्यात आली. मात्र, आज तिसऱ्या बछड्यानेही आपला जीव सोडला. या घटनेच्या तपासानंतर वनविभाग आणि वन्यप्रेमींनी तीव्र भावनेतून संताप व्यक्त केला आहे 

वाघिणीसह दोन बछडे मृत झाल्याची घटना 1 जानेवारीला दुपारी उघडकीस आली होती. तिथेच अर्धवट खाल्लेली गाय आढळली होती. त्या गाईवर विषप्रयोग केला असण्याची शक्यता असल्याने चौकशीसाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची चमू आज दाखल झाली होती. या वाघिणीला तीन बछडे असल्याचे लक्षात आल्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शोध घेतला असता तिसरा देखील मृतावस्थेत आढळला. याप्रकरणी दिवाकर नागोळकर याला अटक केली असून गाईच्या मासावर आपण विष टाकल्याची कबुली त्याने दिली. आपल्या गाईचे वासरू वाघाने मारून खाल्ल्याने बदल्याच्या भावनेतून त्याने हे कृत्य केल्याचं त्यांन सांगितलं. त्याला अटक करण्यात आली असून वन कोठडीत ठेवण्यात आले आहे.

Web Title: Waghini's third calf also poisoned, outraged by wildlife lovers in nagpur umarkhed karhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.