उपराजधानीत पोलिसांचा अभूतपूर्व बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 10:43 PM2019-04-09T22:43:04+5:302019-04-09T22:44:10+5:30

गुरुवारी पार पडणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलिसांनी अभूतपूर्व बंदोबस्त लावला आहे. स्थानिक पोलीस आणि होमगार्डस्च्या मदतीला केंद्रीय तसेच राज्य राखीव दलाच्या तुकड्या आणि मुंबई, नाशिक, सांगली तसेच धुळ्यावरूनही अतिरिक्त पोलीस बळ मागवून घेण्यात आले आहे.

An unprecedented Police bandobast in Sub-Capital | उपराजधानीत पोलिसांचा अभूतपूर्व बंदोबस्त

उपराजधानीत पोलिसांचा अभूतपूर्व बंदोबस्त

Next
ठळक मुद्देरात्रंदिवस गस्त, ठिकठिकाणी आकस्मिक नाकेबंदी : गुन्हेगार, उपद्रवी समाजकंटकांवर नजर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुरुवारी पार पडणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलिसांनी अभूतपूर्व बंदोबस्त लावला आहे. स्थानिक पोलीस आणि होमगार्डस्च्या मदतीला केंद्रीय तसेच राज्य राखीव दलाच्या तुकड्या आणि मुंबई, नाशिक, सांगली तसेच धुळ्यावरूनही अतिरिक्त पोलीस बळ मागवून घेण्यात आले आहे.
देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपूर लोकसभा मतदार संघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे निवडणूक लढत आहेत. त्यामुळे येथील लढतीवर देशाचे लक्ष लागलेले आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे घडलेल्या स्ट्राँग रूम क्लिपिंग, सोशल मीडियावरून आक्षेपार्ह विधाने आदी घडामोडींमुळे मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान गालबोट लागण्याची भीती लक्षात घेऊन पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला आहे. उपद्रवी मंडळी मुद्दामहून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला गेल्यास परिस्थिती कशी हाताळायची, यासंबंधाने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण (इलेक्शन ट्रेनिंग) देण्यात आले आहे. निवडणुकीचे मतदान भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शहरातील ७,५०० पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मदतीला १५०० होमगार्डस् घेतले आहेत. सीआयएसएफची एक तर एसआरपीएफच्या दोन कंपन्याही बंदोबस्तासाठी बोलवून घेतल्या. सोबतच सांगलीच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातून २५० पोलीस, धुळ्याच्या प्रशिक्षण केंद्रातील ५० महिला पोलीस, मुंबई रेल्वेचे १०० जवान आणि नाशिक पोलीस अकादमीतून ६५ पोलीस अधिकारीही बोलवून घेण्यात आले आहे. नागरिकांना आश्वस्त करण्यासाठी विविध भागात फ्लॅग मार्च काढण्यात येत आहे. रात्रंदिवस पोलिसांची गस्त सुरू आहे. स्ट्राँग रूम, संवेदनशील वस्त्या आणि मतदान केंद्रांवर तसेच आजूबाजूला प्रचंड पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पुढच्या ३६ तासात रात्रंदिवस गस्त तसेच ठिकठिकाणी आकस्मिक नाकेबंदी केली जाणार आहे. शहरातील गुन्हेगारांना, नाहक वाद घालून उपद्रव करण्याची सवय असलेल्या समाजकंटकांवर नजर रोखण्यात आली आहे.
 

७,५०० स्थानिक पोलीस, १५०० होमगार्डस्
केंद्रीय तसेच राज्य राखीव दलाच्या तुकड्या
नाशिक, सांगली तसेच धुळ्यावरून अतिरिक्त पोलीस बळ
मुंबई रेल्वे पोलिसही मदतीला


रात्रंदिवस गस्त, आकस्मिक नाकेबंदी ,छापेमारी, सर्चिंग सुरू

वाढलेली वर्दळ लक्षात घेत झोपडपट्टींमध्ये सर्चिंग, कोम्बिंग ऑपरेशन राबविले जात आहे. पाचपेक्षा जास्त जण रात्री ९ नंतर झोपडपट्टीत दिसल्यास त्यांना ताबडतोब ताब्यात घेण्यात येणार आहे. तपासणी करून त्यांचा तेथे जाण्याचा हेतू तपासण्यात येत आहे. अवैध दारूविक्रेत्यांविरुद्ध धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे.

 

 

Web Title: An unprecedented Police bandobast in Sub-Capital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.