"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
By योगेश पांडे | Updated: September 30, 2024 20:01 IST2024-09-30T20:01:27+5:302024-09-30T20:01:57+5:30
Maharashtra Assembly Election 2024: कळमेश्वर येथील सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘डिपॉझिट’ जप्त करण्याचे वक्तव्य केले होते. यावरून भाजपमध्ये संतापाचा सूर आहे.

"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
- योगेश पांडे
नागपूर - कळमेश्वर येथील सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘डिपॉझिट’ जप्त करण्याचे वक्तव्य केले होते. यावरून भाजपमध्ये संतापाचा सूर आहे. दम असेल तर उद्धव ठाकरे यांनी दक्षिण-पश्चिम नागपुरातून फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान भाजप नेते व फडणवीसांचे मानद सचिव संदीप जोशी यांनी केले आहे.
उद्धव ठाकरे यांनी कळमेश्वर येथे रविवारी सायंकाळी आयोजित सभेदरम्यान फडणवीस यांच्याबाबत वक्तव्य केले होते. यावर जोशी यांनी भाजप कार्यकर्त्यांची भावना मांडली. देवेंद्र फडणवीस हे स्वत:च्या कर्तुत्वाने वर आलेले नेते आहेत. वयाच्या २१ व्या वर्षीपासून ते राजकारणात आहेत. तर उद्धव हे केवळ बाळासाहेबांच्या पुण्याईमुळे समोर आले आहेत. अशा उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्याबाबत बोलणे म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने असल्यासारखे आहे. उद्धव यांनी एखाद्या कार्यकर्त्याचा बळी देण्यापेक्षा स्वत: दक्षिण-पश्चिम नागपुरातून लढून दाखवावे. तेव्हा कुणाची जमानत जप्त होते हे लक्षात येईल, असे जोशी म्हणाले.