Ramtek Lok Sabha Election 2019 live result & winner: Krupal Balaji Tumane VS Kishore Gajbhiye Votes & Results first round | रामटेक लोकसभा निवडणूक निकाल २०१९; आघाडीच्या उमेदवारांत पहिल्या फेरीपासूनच चुरस
रामटेक लोकसभा निवडणूक निकाल २०१९; आघाडीच्या उमेदवारांत पहिल्या फेरीपासूनच चुरस

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: रामटेक लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत काटोल विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे कृपाल तुमाने यांना पहिल्या फेरीत २०७१ मते असून काँग्रेसच्या किशोर गजभिये यांना १२४३ मते मिळाली आहेत. तर सावनेर, रामटेक विधानसभा क्षेत्रात किशोर गजभिये आघाडीवर आहेत. रामटेक मतदार संघात मतदारांची एकूण संख्या १८,९७,६०० एवढी आहे. त्यात पुरुष मतदार ९,८५,५३९ तर स्त्रिया मतदार ९,१२,०६१ एवढ्या आहेत. येथे एकूण १६ उमेदवार आपले भाग्य आजमावीत आहेत. रामटेकला झालेल्या मतदानाची टक्केवारी ६२.१२ एवढी आहे. येथे ११ लाख ९३ हजार ३०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात ६ लाख ३९ हजार १२२ पुरुष मतदा

र, तर ५ लाख ५४ हजार १८३ महिला मतदार तसेच २ इतर मतदारांचा समावेश आहे.

Web Title: Ramtek Lok Sabha Election 2019 live result & winner: Krupal Balaji Tumane VS Kishore Gajbhiye Votes & Results first round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.