नागपूर पूर्व निवडणूक निकाल:खोपडे यांची हॅट्रिककडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 13:39 IST2019-10-24T13:38:21+5:302019-10-24T13:39:38+5:30
Nagpur East Election Results 2019: Krushna Khopade , Puroshottam Hajare

नागपूर पूर्व निवडणूक निकाल:खोपडे यांची हॅट्रिककडे वाटचाल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर पूर्वविधानसभा मतदारसंघात भाजपचे आ. कृष्णा खोपडे हे आता विजयाची हॅट्ट्रिक मारण्याच्या स्थितीत आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार नगरसेवक पुरुषोत्तम हजारे यांच्यापेक्षा मोठ्या फरकाची आघाडी घेतली आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत खोपडे यांनी काँग्रेसचे अॅड.. अभिजित वंजारी यांचा ४० हजार ४७४ मतांनी पराभव केला होता.
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होऊन तेराव्या फेऱ्यांनंतर कृष्णा खोपडे यांना ७९२२४ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी हजारे यांना ६१५१३ मते मिळली. मताधिक्य १७७११ एवढे आहे.