Maharashtra Assembly Election 2019 : विकास ठाकरे यांचा पदयात्रेद्वारे जनसंपर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 00:33 IST2019-10-20T00:32:32+5:302019-10-20T00:33:50+5:30
पश्चिम नागपूरचे काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी पदयात्रा करीत मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क करण्यावर भर दिला. त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी मात्र प्रत्येक प्रभागात रॅली काढली.

Maharashtra Assembly Election 2019 : विकास ठाकरे यांचा पदयात्रेद्वारे जनसंपर्क
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पश्चिम नागपूरचे काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी पदयात्रा करीत मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क करण्यावर भर दिला. त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी मात्र प्रत्येक प्रभागात रॅली काढली.
ठाकरे यांच्या पदयात्रेला अवस्थीनगर येथून सुरुवात झाली. ही पदयात्रा मनशा चौक, आदर्श कॉलनी, एसबीआय कॉलनी, रोज कॉलनी, सूरजनगर, अनंतनगर, राठोड ले-आऊट, पलोटीनगर, जाफरनगर येथे पोहोचून सांगता झाली. दरम्यान ठाकरे यांनी युवा, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. या पदयात्रेत ईश्वर बरडे, ओवेस कादरी, अरुण डवरे, विलास बरडे, राम कळंबे, मीना तिडके, जावेद भाई, अरुण मानकर, प्रमोद सिंग ठाकूर, दिलीप मलिक, जगदीश कोहळे, सुभाष मानमोडे, राजेश पायतोडे, स्वप्नील पातोडे, जगदीश गमे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले.