Maharashtra Assembly Election 2019: Development strategy will be implemented till last fall: Girish Pandav | Maharashtra Assembly Election 2019 : शेवटच्या घटकापर्यंत विकासात्मक धोरण राबविणार  : गिरीश पांडव
Maharashtra Assembly Election 2019 : शेवटच्या घटकापर्यंत विकासात्मक धोरण राबविणार  : गिरीश पांडव

ठळक मुद्देदक्षिण नागपुरात पदयात्रा

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : आपण कोणत्याही बाबतीत कुणाशीही भेदभाव केला नाही. विकास कामातही भेदभाव करणार नाही. शेवटच्या घटकापर्यंत विकासाचे धोरण राबवू, असे मत दक्षिण नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव यांनी व्यक्त केले.
गिरीश पांडव यांच्या पदयात्रेला प्रभाग क्र. २८, हनुमान मंदिर, प्रगती कॉलनी, उमरेड रोड, येथून सुरूवात झाली. त्यानंतर सर्वश्रीनगर, कीर्तीनगर, बेलदारनगर, रामकृष्णनगर, योगेश्वरनगर, शिवसुंदरनगर, साईबाबानगर, जुनी दिघोरी आणि आदिवासीनगर आदी वस्त्यांमध्ये जनसंपर्क होत असताना ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच युवकांचा पदयात्रेत मोठ्या संख्येने समावेश होता.
पदयात्रेमध्ये अ‍ॅड. अभिजित वंजारी, गजराज हटेवार, प्रवीण गवरे, डॉ. विठ्ठलराव कोंबाडे, अजय हटेवार, प्रशांत धवड, योगेश तिवारी, जयंत लुटे, प्रमोद सोरते, परमेश्वर राऊत, अशोक काटले, उमेश शाहू, किशोर गिद, विश्वेश्वर अहिरकर, दिनेश तराळे, चक्रधर भोयर, पिंटू तिवारी, नीलेश चंद्रिकापुरे, चंद्रशेखर हिंगणेकर, भाऊराव कोकणे, दिनेश तिरमारे, प्रशांत आसकर, प्रशांत बारसागडे, भूपेंद्र सोनी तसेच महिला कार्यकर्त्यांमध्ये संगीता उपरीकर, सुनीता कुकडे, प्रीती कदम, रेखा पाटील, लीला कुकडे, कविता घुबडे, लता कामडी, रेखा बसेशंकर, रंजना कडूकर, उषा रोकडे, शुभांगी काळे, वनिता भोयर, रेखा बरगट, रेखाताई थूल, शालिनी शामकुंवर, अ‍ँड. वंदना चहांदे, नलिनी करांगळे, रेखा डोंगरे, सुषमा आंभोरकर, शकुंतला राऊत, रत्नमाला जाधव, माया घोरपडे आदी सहभागी झाल्या.


Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Development strategy will be implemented till last fall: Girish Pandav
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.