Maharashtra Assembly Election 2019 : विदर्भात काँग्रेस बळकट होत आहे:बाळासाहेब थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 23:51 IST2019-10-12T23:51:07+5:302019-10-12T23:51:30+5:30
विरोधकांकडून काँग्रेस संपत असल्याचा प्रचार करण्यात येत आहे. परंतु काँग्रेस पक्ष विदर्भात बळकट होत असून नागरिक पक्षाशी जुळत आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले.

Maharashtra Assembly Election 2019 : विदर्भात काँग्रेस बळकट होत आहे:बाळासाहेब थोरात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विरोधकांकडून काँग्रेस संपत असल्याचा प्रचार करण्यात येत आहे. परंतु काँग्रेस पक्ष विदर्भात बळकट होत असून नागरिक पक्षाशी जुळत आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले. कांजी हाऊस चौकात उत्तर नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. नितीन राऊत यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. थोरात म्हणाले, लोकसभा निवडणूक राष्ट्रीय मुद्यावर लढविण्यात येते, तर विधानसभा निवडणुकीत स्थानिक मुद्दे महत्त्वाचे असतात. नागरिकांना ही बाब माहीत असूनही ते यावर विचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर किशोर डोरले होते. यावेळी उत्तर नागपूरचे उमेदवार डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शब्बीर अहमद विद्रोही, महेंद्र भांगे, वर्षा शामकुळे, नगरसेवक परसराम मानवटकर, एस. क्यू. जमा, मंगेश सातपुते उपस्थित होते. संचालन सूर्यकांत जायस्वाल यांनी केले. यावेळी नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.