Maharashtra Assembly Election 2019 : भाजपच्या चुकीच्या धोरणांनी बजेट बिघडविले : आशीष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:34 AM2019-10-15T00:34:50+5:302019-10-15T00:38:33+5:30

महागाई, सरकारची चुकीची धोरणे व या परिसराकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे सरकार अयशस्वी ठरले असून जनतेमध्ये रोष आहे, असे वक्तव्य दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी केले.

Maharashtra Assembly Election 2019 : BJP's wrong policies spoil budget: Ashish Deshmukh | Maharashtra Assembly Election 2019 : भाजपच्या चुकीच्या धोरणांनी बजेट बिघडविले : आशीष देशमुख

Maharashtra Assembly Election 2019 : भाजपच्या चुकीच्या धोरणांनी बजेट बिघडविले : आशीष देशमुख

Next
ठळक मुद्देसर्वसामान्य जनतेने मांडल्या व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मतदार संघात जनसंपर्क करीत असताना भाजप सरकारविरोधी जनआक्रोश सर्वत्र दिसून येत आहे. महागाई, सरकारची चुकीची धोरणे व या परिसराकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे सरकार अयशस्वी ठरले असून जनतेमध्ये रोष आहे, असे वक्तव्य दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी केले.
सुभाषनगर, अंबाझरी ले-आऊट, डागा ले-आऊट, गांधीनगर, बजाजनगर, अभ्यंकरनगर, लक्ष्मीनगर, दीक्षाभूमी, तकिया, धंतोली या मार्गालगतच्या परिसरात आशिष देशमुख यांनी सोमवारी प्रचार केला. या जनसंपर्क दौऱ्यात गृहिणी, छोटे व्यापारी, बेरोजगार युवक-युवती, मजुरांनी त्यांच्याशी चर्चा केली. सायंकाळी दंतेश्वरी व धनगरपुरा झोपडपट्टी, आॅरेंजसिटी, खामला येथे पदयात्रा व रात्री छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची जाहीर सभाही पार पडली.
या सरकारने दक्षिण-पश्चिम क्षेत्राचा काहीच विकास केला नाही. फक्त घोषणा केल्या, असा आरोप आशिष देशमुख यांनी केला. नागपुरातील महिलांची सुरक्षा वाढवून सशक्तीकरणासाठी प्रयत्न करणे, गृहोद्योगासाठी विशेष प्रशिक्षण, गुन्हेगारीवर आळा, नागपूरमध्ये महिला पोलिसांची संख्या वाढविणे, घनकचºयाची इकोफ्रेंडली विल्हेवाट, दूषित पाण्यावर प्रक्रिया प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा, झोपडपट्टीमधील नाल्या, पाण्याचे लिकेज बंद करणे व रस्ते दुरुस्ती, उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूक व रोजगारनिर्मिती, नागपूर शहराचे स्मार्ट सिटीमध्ये रूपांतर करून औद्योगिक नगरी व आर्थिक विकासावर भर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून २१ व्या शतकातील जागतिक दर्जाच्या सुविधा जनतेला उपलब्ध करून देणे, हा आपला संकल्प असल्याचे डॉ. आशिष देशमुख यांनी यावेळी जाहीर केले. २०१४ मध्ये दिलेल्या आश्वासनाचे उत्तर सरकारकडे नाही, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019 : BJP's wrong policies spoil budget: Ashish Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.