Maharashtra Assembly Election 2019: Bike rally organized by Nitin Raut | Maharashtra Assembly Election 2019 : नितीन राऊत यांनी काढली बाईक रॅली 
Maharashtra Assembly Election 2019 : नितीन राऊत यांनी काढली बाईक रॅली 

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उत्तर नागपूरचे काँग्रेस उमेदवार डॉ. नितीन राऊत यांनी बाईक रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. रॅलीमध्ये मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते. काँग्रेसचा झेंडा, पंजाचे पोस्टर्स घेऊन कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते. उघड्या जीपवर नितीन राऊत हे हात जोडून मतदारांना काँग्रेसला साथ देण्याचे आवाहन करीत होते.
इंदोरा चौकातून सुरू झालेल्या रॅलीने संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला. दरम्यान प्रमुख चौकांमध्ये राऊत यांचे स्वागत करण्यात आले. बऱ्याच ठिकाणी रॅलीवर पुष्पवर्षाव करण्यात आला. गेल्या १० ते १२ दिवस डॉ. राऊत यांनी संपूर्ण मतदार संघात सभा, बैठका, पदयात्रा माध्यमातून जनसंपर्क केला. काँग्रेसची ध्येयधोरणे मतदारांना पटवून दिली. रॅलीमध्ये कृष्णकुमार पांडे, संजय दुबे, बंडोपंत टेंभुर्णे, राजा करवाडे, अनिल नगरारे, सुमेधा राऊत, ठाकूर जग्यासी, सुरेश जग्यासी, फिलिप जायसवाल, हरिभाऊ किरपाने, रत्नाकर जयपूरकर, कुणाल राऊत, दीक्षा राऊत, क्षितिज अड्याळकर, अजित सिंह, इंडियन मुस्लिम लीगचे माजी नगरसेवक असलम मुल्ला, मनोज बन्सोड, नगरसेवक दिनेश यादव, परसराम मानवटकर, नेहा निकोसे, सुरेश पाटील, राणा गमदूर, विजया हजारे, बेबी गौरीकर, वर्षा शामकुळे, स्वामिनी डोंगरे, साहेबराव शिरसाट, बॉबी दहीवले, खुशाल हेडाऊ, विनोद सोनकर, मंगेश सातपुते, तुषार नंदागवळी, धीरज पांडे, गौतम अंबादे, आसिफ शेख, असद खान, जयकुमार रामटेके, सतीश चौकसे, सलीम खान, इरशाद शेख, पंकज बोरकर, महेंद्र बोरकर, पंकज सावरकर, राम यादव, चेतन तरारे, सतीश पाली, संतोष खडसे, अभिलाष सिरसाट, आतिश साखरे आदींचा समावेश होता.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Bike rally organized by Nitin Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.