जायगावी एकलव्य जयंतीनिमित्त अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 16:42 IST2021-03-15T16:41:01+5:302021-03-15T16:42:25+5:30
नायगाव : सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे एकलव्य जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे अध्यक्ष संजय जाधव यांच्या उपस्थितीत एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे शूरवीर एकलव्य यांना जयंती निमित्ताने अभिवादन करताना, संघटनेचे संजय जाधव, दत्ता दिघोळे, सुदर्शन सानप, सचिन दिघोळे, अमोल सानप आदींसह ग्रामस्थ.
ठळक मुद्दे यावेळी एकलव्य जयंती निमित्ताने सुदर्शन सानप यांनी ग्रामपंचायत कार्यालयास प्रतिमा भेट दिली.
नायगाव : सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे एकलव्य जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे अध्यक्ष संजय जाधव यांच्या उपस्थितीत एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सरपंच शालिनी दौंड, उपसरंच दत्ता दिघोळे, अमोल सानप, ग्रामपंचायत सदस्य शरद जाधव, सचिन दिघोळे, नवनाथ शेलार, सुरेश गायकवाड, पांडुरंग जाधव, पुंडलीक, शिवाजी जाधव आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी एकलव्य जयंती निमित्ताने सुदर्शन सानप यांनी ग्रामपंचायत कार्यालयास प्रतिमा भेट दिली.