Counting: Closing Kalamana Market Three Days | मतमोजणी : कळमना मार्केट तीन दिवस बंद
मतमोजणी : कळमना मार्केट तीन दिवस बंद

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : नागपूररामटेक मतदार संघाच्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कळमना यार्डमध्ये होणार आहे. जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी अश्विन मुद्गल यांनी ३० एप्रिलला झालेल्या बैठकीत कळमना मार्केट यार्ड अंतर्गत सर्व बाजारातील व्यवहार २१ मे रोजी सायंकाळी ७ पासून २४ मे रोजी सायंकाळपर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या संबंधित पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला दिले आहे. या दिवशी बाजारात कोणतेही व्यवहार होणार नसल्याची नोंद शेतकरी, अडते, व्यापारी, हमाल आणि नागरिकांनी घ्यावी. या दिवशी शेतकऱ्यांनी बाजार समितीत माल विक्रीसाठी आणू नये, असे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

 


Web Title: Counting: Closing Kalamana Market Three Days
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.