About two lakh cash was found in East Nagpur | पूर्व नागपुरात सव्वा दोन लाखांची रोकड सापडली
पूर्व नागपुरात सव्वा दोन लाखांची रोकड सापडली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रातील वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या प्रजापती चौक येथे एका वाहनातून २ लाख ३८ हजारांची रोकड सापडली. ही रोकड वाठोडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली.
निवडणुकीच्या काळात काळ्या पैशाचा वापर होण्याची शक्यता असल्याने यावर पाळत ठेवण्यासाठी एसएसटी पथक गठित करण्यात आले आहे. या पथकाद्वारे नाकाबंदी करून वाहनांची चौकशी करण्यात येत आहे. प्रजावती चौक येथे तपासणीदरम्यान एका चारचाकी वाहनात २ लाख ३८ हजार ३०० रुपये मिळाले. चौगुले नामक व्यक्तीची ही रोकड असल्याचे सांगण्यात येते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्ती हा वरोरावरून ट्रक खरेदी करण्यासाठी कामठीत आला होता. मात्र त्याला ट्रक खरेदी करता आला नसल्याने नागपुरात आला. येथेही ट्रक मिळाला नाही. वरोराकडे परत जात असताना पथकाला तपासणीदरम्यान ही रक्कम मिळाली. संबंधितास रकमेबाबत खुलासा मागण्यात आला. आवश्यक माहिती देण्यासाठी तीन, चार तासांचा वेळ देण्यात आला. मात्र त्याच्याकडून आवश्यक माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे रात्रीच्या सुमारास ही रक्कम वाठोडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली. पुढील चौकशी केली जात आहे.

Web Title: About two lakh cash was found in East Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.